Uncategorizedठळक बातम्या
महाशिवरात्र विशेष; आजपासून निटूर येथे सांब कथेस प्रारंभ


श्री ष.ब्र.१०८ तपोनिधी सांब शिवयोगीश्वर महाराज यांच्या जन्मोत्सवानिमित्त निलंगा तालुक्यातील निटूर येथे आज दि.१६ ते २५ फेब्रुवारीपर्यंत उपाचार्यरत्न बालतपस्वी द्वितीय सांब स्वामी महाराज यांच्या अमृतवाणीने सांब कथा सोहळा व कोटी जप यज्ञाचे सांब मठात आयोजन करण्यात आले आहे.
कथे सोबत १ कोटी जप यज्ञाचे ही आयोजन
दि.१६ ते २४ फेब्रुवारी दररोज रात्री आठ वाजता तपोनिधी सांब शिवयोगीश्वर महाराज यांची कथा सांगण्यात येईल.त्याचप्रमाणे दररोज सकाळी जप ,भजन, दर्शन होईल.
दि.२५ रोजी सकाळी पाळणा कार्यक्रम होईल.त्यानंतर ५००१ सुहासिनी महीलाची ओटी भरण्यात येणार आहे.या कार्यक्रमानंतर तपोनिधी सांब शिवयोगीश्वर महाराज यांची भव्य मिरवणूक निघणार आहे.तसेच सर्व उपस्थित भाविकांसाठी प्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.निटूर व परिसरातील भाविक भक्तांनी उपस्थित राहावे असे आवाहन समस्त सदभक्त निटूर यांनी केले आहे.