महाराष्ट्र शासनाने शिवचरीत्राचे अत्यंत अल्प दरात प्रकाशन करावे


प्रा.डॉ साहेबराव गाठाळ यांची मागणी
इतर राष्ट्रपुरुषांच्या चारित्र्य प्रमाणे महाराष्ट्र शासनाने शिवचरित्राचे प्रकाशन करून शिवचरित्र माफक दरात जनतेला उपलब्ध करून द्यावे . महाराष्ट्रातील प्रत्येक घराघरात शिवचरित्र असणे ही महाराष्ट्रीया साठी अभिमानाची व पुढील पिढीसाठी संस्काराची बाब आहे असे विचार थोर विचार संशोधक इतिहास संशोधक व इतिहास लेखक डॉ. साहेबराव गाठाळ यांनी व्यक्त केले.
. ज्येष्ठ नागरिक संघ अंबाजोगाईच्या मासिक बैठकीच्या शिवजयंती उत्सवाच्या निमित्ताने ते बोलत होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या यशामागे महाराजांनी त्या काळात राबवलेल्या विविध धोरणांचा सविस्तर माहिती दिली .छत्रपती शिवाजी महाराजांचे शेतकऱ्या विषयीचे शेतीप्रधान धोरण , महिलांचा योग्य सन्मान व महिलांना प्रोत्साहन , तत्त्वनिष्ठ व गतीमान न्यायप्रणाली , रयतेसाठी सामाजिक सुरक्षितता धोरण , कठोरशिस्तप्रीय , मूल्याधिष्ठित राजकारभार , विशेष गनीमीकावा युद्धनीती , सैनिक सुरक्षिततेचे विशेष धोरण , लश्काराची भविष्यवेधी उभारणी ,व स्वतःचे चारित्र्यसंपन्न व्यक्तिमत्व ,राज्यातील सर्व धर्मीयांचा सन्मान व सर्वांना एकत्रित घेऊन चालण्याची वृत्ती लष्करात व कारभारात सर्व जाती-धर्माच्या लोकांना प्रतिनिधित्व अशा विविध रचनात्मक व दृष्ट्या धोरणामुळे अत्यंत खडतर व प्रतीकुल परिस्थीतीत शिवराज शिवरायांचे स्वराज्य उभा राहिले व शिवाजी महाराज जगभरात एक कर्तत्वान , चरित्रवान ,दिशादर्शक व युगप्रवर्तक रयतेचे राजे म्हणून प्रसिद्ध आहेत. प्रा.डॉ. साहेबराव गाठाळ यांची मागणी


महाराजांचे कृषिविषयक धोरण महत्वपुर्ण होते यात जास्तीत जास्त पडीक जमीन शेती योग्य करण्यात आली प्रथमच शेतीची मोजणी करण्यात आली. गाव व शिव निश्चित करण्यात आल्या ,शेतीला आवश्यक अवजारे व बियाणे पुरवण्याचे धोरण आखण्यात आले जंगली जनावरापासून शेतीचे संरक्षण करण्यात आले वृक्ष लागवड व संवर्धन धोरण राबवण्यात आले , शेतकऱ्यांचा शेतसारा कमी करून त्यांना जास्तीत जास्त महसुली वाटा देऊन शेती करण्यासाठी प्रोत्साहन देण्यात आले. स्त्रियांना सन्मानाची वागणूक प्रथमच देण्याचे धोरण , स्त्रियावर अन्याय अत्याचार करणाऱ्यावर कठोर शासन करण्यात आले. सर्व जाती-धर्माचे लोक एकत्र घेऊन स्वराज्याचा हा लढा उभा करण्यात आला स्वराज्य मध्ये सर्वच धर्मांचा व धर्मगुरूंचा आदर व सन्मान होता .


महाराजांची वेगळी लष्करणीती होते यात युद्धात मृत्यू पावणाऱ्या सैनिकांच्या वारसांना सैन्यात सामावून घेणे ,जखमींना आर्थिक मदत करणे , आवश्यक शत्रांचे कारखाने उभारणे , भव्य नौदलाची उभारणी करणे , अभेद्य किल्यांची निर्मिती ,सैनिकांचे सतत मनोबल उंच ठेवणे ,सर्व जाती-धर्मास लष्करात समाविष्ट करणे, सैनिकांना पेन्शन व्यवस्था करुण लश्कराचे वेगळे व दुरदृष्टीचे धोरण राबवणारा पहिले राजे होते.अशी विस्तृत माहितीही त्यांनी दिली.
कार्यक्रमाचे अध्यक्ष जेष्ठ नागरिक संघाचे पुंडलीक पवार होते तर व्यासपीठावर , डाॕ.दामोदर थोरात , अॕड .अनंत जगतकर , कमलताई बरुळे होते.कार्यक्रमाचे संचालन मनोहर कदम यांनी केले. कार्यक्रमास जेष्ठ महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थीत होते .