महाराष्ट्र दिनी अंबाजोगाईत “रंगरेझा” सांगितिक कार्यक्रमाचे आयोजन


अंबाजोगाईत पहिल्यांदाच पहायला मिळणार आंतरराष्ट्रीय कलाकारांचा परफॉर्मन्स


बॉम म्युझिक स्कुलचा उपक्रम!
महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून अंबाजोगाई शहरात आंतरराष्ट्रीय कलाकारांच्या “रंगरेझा” या सांगितिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात आंतरराष्ट्रीय कलाकारांचा परफॉर्मन्स पाहण्याची संधी पहिल्यांदाच मिळणार आहे.


महाराष्ट्रातील उमलते संगीतकार अंबाजोगाईचे भुमी पुत्र ओंकार रापतवार यांच्या पुढाकाराने या “रंगरेझा” या सांगितिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. योगेश्वरी महाविद्यालय आणि योगेश्वरी तंत्रनिकेतन महाविद्यालय परीसरातील मैदानात या “रंगरेझा” कार्यक्रमाचे आयोजन महाराष्ट्र दिनी सायंकाळी ५:३० वाजता करण्यात आले आहे.


या “रंगरेझा” सांगीतिक कार्यक्रमात राजस्थान येथील मयुर रामावत (सिंगर), दिल्ली येथील बाल नारंग (बास गिटार), भोपाळ येथील अर्जित श्रीवास्तव (पियानो), मुंबई येथील भैरवी पाटील (सिंगर), मुंबई येथील विवेक देवांगन (फ्ल्युट), अंबाजोगाई येथील वैभव इंगलेवाढ, शैलेश कंगळे (परक्युशिअन) आणि संपुर्ण महाराष्ट्रात आपली संगीतकार म्हणून नवी ओळख निर्माण करणारा, १७ सांगितिक वाद्दांवर आपल्या बोटांची जादु फिरवणारा अंबाजोगाईचा भुमी पुत्र ओंकार रापतवार याचा सहभाग राहणार आहे.


साधारणपणे दोन तास चालणाऱ्या या रंगारंग “रंगरेझा” कार्यक्रमात अत्याधुनिक संगितवाद्दांसह, नव्या आणि जुन्या गितांचा जोरदार सांगीतिक आविष्कार पहायला आणि ऐकायला मिळणार आहे. अंबाजोगाई येथील बॉम म्युझिक स्कुलच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रोटरी आणि रोटरॅक्ट क्लब सहकार्य करीत आहे.


असून या कार्यक्रमाची तिकीट विक्री सोनवणे कुशन जवळील “बॉम म्युझिक स्कुल”, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातील “चाय-वाय कॅफे”, नगर परिषदेच्या आद्दकवी स्वामी मुकुंदराज सभागृहा जवळील “योगेश्वरी पान सेंटर” आणि बसस्थानक जवळील मोहन कॉम्प्लेक्स मधील “किंग फीटनेस” येथे सुरु करण्यात आली आहे.


मोजक्याच जागा शिल्लक असल्यामुळे आगावू तिकीट विक्री साठी 70206 82390, 80072 43214, आणि 7709664511 या भ्रमण ध्वनीवर संपर्क साधावा असे आवाहन ओंकार रापतवार आणि संयोजक सहका-यांनी केले आहे.