महाराष्ट्रात सर्वत्र धो धो पाऊस… मांजरा धरणात मात्र शुन्य पातळीखाली पाणी!
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/07/image_editor_output_image-133917580-1689505427873.jpg)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/07/image_editor_output_image-133917580-1689505427873.jpg)
महाराष्ट्रात सर्वत्र धो धो पाऊस सुरु असताना बीड लातुर आणि उस्मानाबाद जिल्ह्यात तसा अत्यंत अल्प असा पावूस झाला आहे. सध्या या तीन ही जिल्ह्यात पिकांना पोषक असा पावूस झाला असला तरी बीड लातूर आणि उस्मानाबाद या तीन जिल्ह्यातील शेकडो गावांना पाणी पुरवठा करणाऱ्या मांजरा धरणात मात्र सध्या फक्त २३.२३ टक्केच पाणीसाठा उपलब्ध आहे.
यावर्षी या तीनही जिल्ह्यात उशीरापर्यंत पावूस नसल्याने पेरण्याही खुप उशीरा सुरू झाल्या. ७ जुन (मृग नक्षत्रा) पासुन हुलकावणी देणारा पावूस ७ जुलै दरम्यान येण्यास सुरुवात झाली. सुरुवात उशिरा का होईना पण झाली. जुलैच्या १० तारखेनंतर अनेक भागात पेरण्या सुरु झाल्या. पेरण्या झाल्यानंतर आता पिकांना पोषक असा पावूस या तीन ही जिल्ह्यात पडतो आहे. मात्र बीड लातूर आणि उस्मानाबाद या तीन जिल्ह्यांतील शेकडो गावांचा पाण्याचा प्रश्नसोडवणा-या मांजरा धरण मात्र जुलै संपत आला तरी अजूनही शुन्य पातळीच्या खालीच आहे.
मांजरा धरणाचे शाखा अभियंता सुरेश निकम यांनी आज २२ जुलै रोजी दिलेल्या अधिकृत माहिती प्रमाणे
मांजरा धरणातील पाणीसाठ्यात यावर्षी आजपर्यंत फक्त ५ जुलै रोजी झालेल्या पावसामुळे फक्त धरणातील पाणी साठ्यात फक्त ५.०६९ दलघमी ने वाढ झाली आहे. धनेगांव ( ता. केज ) येथील मांजरा धरण क्षेत्रात ५ जुलै रोजी ५७ मिमी पाऊस झाला आहे. त्यामुळे धरणाच्या पाणी साठ्यात ५.०६९ दलघमी इतकी वाढ झाली आहे.
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/07/image_editor_output_image-1192134535-1689505396228.jpg)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/07/image_editor_output_image-1192134535-1689505396228.jpg)
लातूर शहर व एमआयडीसी, अंबाजोगाई, केज, धारूर, कळंब या शहरासह ६३ गावांना पाणी पुरवठा करणाऱ्या २२४.०९३ दलघमी साठवण क्षमतेच्या धनेगाव ( ता. केज ) येथील मांजरा धरणाच्या पाणी साठ्यात घट होत चालली होती. धरणात पावसाळ्याच्या सुरुवातीच्या दोन महिन्यात पाणी साठा समाधानकारक वाढत नसला तरी मागील तीन वर्षांपासून परतीच्या पावसाने धरण हे ओव्हरफ्लो होत आहे. या वर्षी ही जून अखेरपर्यंत पावसाने दडी मारली होती. मात्र ५ जुलै रोजी धरण क्षेत्राच्या कॅचमेंट एरीयातील युसुफवडगाव आणि होळ मंडळात दमदार पाऊस झाला. धरण क्षेत्रात ५७ मिमी इतका पाऊस पडल्याने धरणाच्या पाणी साठ्यात ५ जुलै च्या एका रात्रीत ५.०६९ दलघमी इतकी वाढ झाली आहे.२२४.०९३दलघमी साठवण क्षमता असलेल्या मांजरा धरणात सध्या ८८.२४७ दलघमी इतका पाणी साठा असल्याची माहिती धरणाचे शाखाधिकारी सूरज निकम यांनी दिली.
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/07/image_editor_output_image-658085135-1690003670231-300x121.jpg)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/07/image_editor_output_image-658085135-1690003670231-300x121.jpg)
मांजरा धरणातील एकुण पाणी पातळी ६४२.३७ मीटर असून सध्या धरणात फक्त ६३७.९६ मी. पर्यंत पाणी साठा उपलब्ध आहे. धरणात पाणी साठवण क्षमता २२४.०९३ दलघमी एवढी असून सध्या धरणात फक्त ८८.२४७ दलघमी एवढा पाणी साठा उपलब्ध आहे. धरणाचा जिवंत पाणीसाठा साठवण क्षमता १७६.९६३ दलघमी असून सध्या धरणात फक्त ४१.११७ दलघमी एवढाच जिवंत साठा आहे. मांजरा धरणात सध्या फक्त २३.२३ टक्के पाणी साठा असून धरण भरण्यासाठी आणखी भरपुर पावसाची आवश्यकता आहे. मांजरा धरणात नदीपात्रातुन येणाऱ्या प्राण्यांचा प्रवाह सध्या शुन्य आहे.
बीड लातुर आणि उस्मानाबाद या तीन जिल्ह्यांत यावर्षी ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात मोठा पावूस पडणार असल्याचे भाकीत वर्तवले आहे. या भाकितानुसार या विभागात मोठा पावूस झाला तरच या धरणाच्या पाणी साठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ होईल नाही तर नेहमीप्रमाणे परतीच्या पावसाकडे डोळे लावून बसावे लागेल.