१४ व्या विधानसभेसाठीच्या २८८ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत महायुतीच्या २३६ उमेदवारांनी विजय मिळवत घवघवीत यश संपादन केले.
या घवघवीत यशानंतर महायुतीचे सरकार स्थापन करण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. नवे मुख्यमंत्री व मंत्रीमंडळाचा उद्या शपथविधी ही होणार आहे. या संभाव्य मंत्रिमंडळात भाजपाच्या संभाव्य मंत्रिमंडळात मागासवर्गीय महिला मंत्री कोण? अशी चर्चा सध्या राज्यात रंगली आहे.
२५ राखीव जागांवर भाजपाचे उमेदवार
१४ व्या विधानसभेसाठी २८८ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने १४९ मतदार संघात आपले उमेदवार उभे केले होते. यापैकी अनुसूचित जाती जमाती साठी राखीव असलेल्या मतदारसंघांपैकी एकुण २५ मतदार संघात भाजपाने आपले उमेदवार उभे केले होते.
२५ उमेदवारात यांचा आहे समावेश
अनुसूचित जाती जमाती च्या या २५
उमेदवारांमध्ये श्री राजेश उडेसिंग पडवी ST, श्री विजयकुमार कृष्णराव गावित ST , श्री काशीराम वेचन पवार ST, श्री संजय वामन सावकर SC ,
श्री हरीश मारोतीप्पा पिंपळे SC ,श्री श्याम खोड़े SC , श्री केवळराम तुलशीराम काले ST , डॉ. मिलिंद माने SC, श्री संजय हनवंतराव पुरम ST , श्री कृष्ण दामाजी गाझबे ST, डॉ. मिलिंद रामजी नारोटे ST, श्री किशोर जॉर्जेवार SC, डॉ. अशोक रामाजी उईके ST , आहे श्री राजू तोडसाम ST, श्री किशन वानखेडे SC, श्री भीमराव रामजी केराम ST, श्री जितेश रावसाहेब अंतापूरकर SC,
श्री नारायण कुचे SC, श्री दिलीप मंगळू बोरसे ST, श्री विनोद मेढा, ST, श्री हरीशचंद्र सखराम भोये ST, श्री सुनील दन्यांदेव कांबळे SC,
*सौ. नमिता मुंदडा** SC,
श्री राम विठोठल सातपुते SC आणि श्री सुरेश खेडे SC यांचा समावेश आहे.
या २५ उमेदवारांपैकी फक्त केज विधानसभा मतदारसंघातील उमेदवार सौ. नमिता अक्षय मुंदडा या महिला उमेदवार उभ्या होत्या.
भाजपाच्या एकमेव मागासवर्गीय महिला आमदार!
केज विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपाच्या उमेदवार महाविकास आघाडीचे उमेदवार पृथ्वीराज साठे यांच्या विरोधात अतिशय तुल्यबळ झालेल्या लढतीत सौ. नमिता अक्षय मुंदडा या १ लाख १५ हजार ६८९ मते मिळवून विजयी झाल्या आहेत. भारतीय जनता पक्षाच्या त्या एकमेव मागासवर्गीय महिला आमदार आहेत.
सर्वसमावेशक मंत्रीमंडळ बनवण्याची परंपरा
महाराष्ट्राच्या आजपर्यंतच्या राजकीय इतिहासात राज्यमंत्री मंडळ सर्वसमावेशक बनावे यासाठी सर्व समाजातील विजयी आमदारांचा समावेश मंत्रिमंडळात करण्याची परंपरा आहे. आजपर्यंत झालेल्या मंत्रिमंडळात मागासवर्गीय महिलांना सातत्याने प्रतिनिधित्व देण्याची ही परंपरा आहे.
१४ विधानसभेसाठी झालेल्या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष हा सर्वाधिक आमदार विजयी करणारा पक्ष ठरलेला आहे, त्यामुळे अर्थातच भारतीय जनता पक्षाला राज्यमंत्री मंडळातील अधिक खाती मिळण्याची शक्यता आहे, त्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या मंत्र्यांचीही संख्या अधिक असण्याची शक्यता आहे. यासर्व पार्श्वभूमीवर संभाव्य मंत्रिमंडळात भाजपा मागासवर्गीय महिला प्रतिनिधी म्हणुन केज विधानसभा मतदारसंघातुन विजयी झालेल्या एकमेव उमेदवार सौ. नमिता मुंदडा यांना स्थान देणार की नाही अशी चर्चा सध्या राज्यात होत आहे.
▪️आ. नमिता मुंदडा उच्चशिक्षित
केज विधानसभा मतदारसंघातुन विजयी झालेल्या सौ. नमिता अक्षय मुंदडा यांची ही दुसरी टर्म आहे. त्या स्वतः उच्चविद्याविभूषित आहेत. त्यांचे पदवी पर्यंतचे सर्व शिक्षण मुंबई येथे झाले आहे तर आर्किटेक्ट ही पदवी त्यांनी अमेरिकेतील उच्च विद्दापीठातुन गोल्ड मेडल मिळवत पुर्ण केली आहे. २०१९ ते २०२४ हा विधानसभेमधील त्यांचा कार्यकाळ अतिशय चांगला राहिला आहे. अधिवेशन काळातील त्यांचा सहभाग अतिशय मुद्देसूद प्रश्न उपस्थित केले असल्यामुळे चर्चेचा विषय ठरला होता.
तुल्यबळ लढतीत मिळवला विजय
केज विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपाच्या उमेदवार महाविकास आघाडीचे उमेदवार पृथ्वीराज साठे यांच्या विरोधात अतिशय तुल्यबळ झालेल्या लढतीत सौ. नमिता अक्षय मुंदडा या १ लाख १५ हजार ६८९ मते मिळवून विजयी झाल्या आहेत. भारतीय जनता पक्षाच्या त्या एकमेव मागासवर्गीय महिला आमदार आहेत. महाराष्ट्राच्या आजपर्यंतच्या राजकीय इतिहासात राज्यमंत्री मंडळ सर्वसमावेशक बनावे यासाठी सर्व समाजातील विजयी आमदारांचा समावेश मंत्रिमंडळात करण्याची परंपरा आहे. आजपर्यंत झालेल्या मंत्रिमंडळात मागासवर्गीय महिलांना सातत्याने प्रतिनिधित्व देण्याची ही परंपरा आहे.
भाजपाला मिळणार सर्वाधिक खाती
१४ विधानसभेसाठी झालेल्या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष हा सर्वाधिक आमदार विजयी करणारा पक्ष ठरलेला आहे, त्यामुळे अर्थातच भारतीय जनता पक्षाला राज्यमंत्री मंडळातील अधिक खाती मिळण्याची शक्यता आहे, त्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या मंत्र्यांचीही संख्या अधिक असण्याची शक्यता आहे. यासर्व पार्श्वभूमीवर संभाव्य मंत्रिमंडळात भाजपा मागासवर्गीय महिला प्रतिनिधी म्हणुन केज विधानसभा मतदारसंघातुन विजयी झालेल्या एकमेव उमेदवार सौ. नमिता मुंदडा यांना स्थान देणार की नाही अशी चर्चा सध्या राज्यात होत आहे.
आ. नमिता मुंदडा यांची दुसरी टर्म
▪️आ. नमिता मुंदडा उच्चशिक्षित केज विधानसभा मतदारसंघातुन विजयी झालेल्या सौ. नमिता अक्षय मुंदडा यांची ही दुसरी टर्म आहे. त्या स्वतः उच्चविद्याविभूषित आहेत. त्यांचे पदवी पर्यंतचे सर्व शिक्षण मुंबई येथे झाले आहे तर आर्किटेक्ट ही पदवी त्यांनी अमेरिकेतील उच्च विद्दापीठातुन गोल्ड मेडल मिळवत पुर्ण केली आहे. २०१९ ते २०२४ हा विधानसभेमधील त्यांचा कार्यकाळ अतिशय चांगला राहिला आहे. अधिवेशन काळातील त्यांचा सहभाग अतिशय मुद्देसूद प्रश्न उपस्थित केले असल्यामुळे चर्चेचा विषय ठरला होता. या सर्व पार्श्वभूमीवर आ. नमिता अक्षय मुंदडा यांचा मंत्रिमंडळात समावेश होतो का नाही हे पहाणे महत्वाचे आहे.
महाराष्ट्रातील प्रगल्भ पत्रकार मराठवाड्यातील पत्रकारितेला एक नवा आयाम देण्याचा त्यांचा यशस्वी प्रयत्न असतो. गावातील पत्रकारिता जिल्ह्यात, राज्य आणि देश पातळीवर नेण्यात त्यांचे मोठे योगदान आहे.