मला माझा राजीव परत द्या…! सोनिया #गांधींचे #पत्रे
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2022/11/sonia-rajeev.jpg)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2022/11/sonia-rajeev.jpg)
आनंद भुसे यांच्या फेसबुक वॉल वरुन साभार
मला माझा राजीव परत द्या, मी निघून जाईन आणि जर तुम्ही माझा राजीव परत देऊ शकत नसाल तर मला शांतपणे त्यांच्या आजुबाजुला ह्याच मातीत मिसळून जाऊ द्या.
तुम्ही पाहिलं होतं ना त्यांना! उंच कपाळ,बोलके डोळे,उंच शरीर आणि त्यांचं हास्य. जेव्हा मी त्यांना पहिल्यांदा पाहिलं होतं तेव्हा पाहतच राहिले होते. मैत्रिणीला विचारलं कोण आहे हा हँडसम तरुण? मैत्रीण बोलली होती तो भारतीय आहे, पंडित नेहरूंच्या कुटुंबातला! मी पाहतच राहिले ह्या पंडित नेहरूंच्या कुटुंबातील तरुणाला.
काही दिवसांनंतर विद्यापीठातील कॅन्टीनमध्ये जेवणासाठी गेले. खूपच मुले होती.तिथे मी कोपऱ्यात एक टेबल घेतला. तिथे ते सुद्धा दुसऱ्या मित्रांबरोबर होते मला वाटलं ते मलाच पाहत आहेत. मी नजर तिकडे फिरवली तर खरच ते मलाच पाहत होते. क्षणभर नजरानजर झाली आणि दोघांनीही नजरा हटवल्या परंतु हृदय जोरात धडधडत होतं.
दुसऱ्या दिवशी जेव्हा मी कॅन्टीनमध्ये गेले, ते आज पण तिथे उपस्थित होते. ते पहिल्या नजरेतलं प्रेम, खरंच तो दिवस खूप खास होता. त्यानंतर आम्ही एकत्र फिरायचो. नदीच्या किनाऱ्यावर जायचो. कारमध्ये दूर चक्कर मारून यायचो. हातात हात घेऊन रस्त्यावर फिरणे. चित्रपट पाहणे…मला आठवत नाही आम्ही एकमेकांना कधी प्रपोज केलं होतं, कारण गरज पडली नव्हती सगळं काही नैसर्गिकरित्या घडून आलं होतं आम्ही एकमेकांचे बनून गेलो होतो. आम्हाला फक्त कायमस्वरूपी एकत्र राहायचं होतं.
त्यांची आई प्रधानमंत्री झाली होती. जेव्हा त्या इंग्लंडला आल्या होत्या, तेव्हा राजीवनी मला त्यांना भेटवलं होतं. आम्ही त्यांच्याकडे लग्नाची परवानगीही मागितली. इंदिराजींनी आम्हाला भारतात यायला सांगितलं.
भारत?
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2022/11/1526900108-346.jpg)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2022/11/1526900108-346.jpg)
हा देश जगातल्या कुठल्याही कोपऱ्यात असला तरी राजीवजी सोबत मी तिथे राहण्यास तयार होतेच.
मी भारतात आले खादीची खास गुलाबी साडी खुद्द नेहरूंजींनी वीणली होती. इंदिराजींनी लग्नात तीच साडी नेसली होती. तीच साडी नेसून मी राजीवच्या कुटुंबाचा घटक बनले आणि मी राजीवची झाले त्यानंतर राजीव माझे आणि मी इथलीच होऊन गेले.
दिवस पंख लावल्याप्रमाणे निघून गेले. राजीवजींचे भाऊ अपघाती मृत्यू पावले. इंदिराजींना आधाराची गरज होती. राजीव राजकारणामध्ये सहभागी होऊ लागले. राजीवजींनी राजकारणात जाणे मला अजिबात मान्य नव्हते. मी त्यांना विरोध केला.त्यांना राजकारणापासून लांब ठेवण्यासाठी खूप प्रयत्न केले. परंतु तुम्ही हिंदुस्तानी माणसं आईसमोर बायकोचं थोडीच ऐकणार?
राजीवजी राजकारणात गेले आणि माझ्यापासून वाटले गेले, त्यांच्यामधील माझा वाटा घटला गेला. एके दिवशी इंदिराजी बाहेर निघाल्या असता गोळ्यांचा आवाज आला. धावत पळून जाऊन पाहिलं तर त्या रक्ताच्या थारोळ्यात पडल्या होत्या. हिंदुस्थानातील लोकांनी त्यांना गोळ्या घातल्या होत्या. त्यांना धावत जाऊन उठवण्याचा प्रयत्न केला. दवाखान्यात घेऊन गेले. त्यांच्या रक्ताने माझे कपडे भिजत होते. माझ्या हातातच त्यांचं जीवन संपलं होतं.
इतक्या #जवळून #तुम्ही #कधी #मृत्यूला #पाहिला #आहे #का?
त्यादिवशी माझ्या कुटुंबातील एक नाही तर दोन सदस्य कमी झाले होते. एक म्हणजे, इंदिराजी जगातून गेल्या होत्या आणि दुसरी व्यक्ती म्हणजे राजीवजी आता पूर्णपणे देशाचे झाले होते. मी भोगलं, साथ दिली जे माझं होतं ते मी देशासोबत वाटलं होतं.
काय मिळालं?
एक दिवस त्यांचं मृत शरीर माझ्यासमोर आणलं, कपड्याने झाकलेला चेहरा, एका हसणाऱ्या गुलाबी चेहऱ्याला मांसाचा गोळा बनवून तुम्ही सर्वांनी माझ्यासमोर ठेवलं होतं.
त्यांचा शेवटचा चेहरा मला विसरायचा आहे.
त्या कॉलेजच्या कॅन्टीनमधली ती पहिली नजर, त्या गाडीत बसून दूर चक्करा मारलेल्या सांजवेळा, ते हास्य फक्त तेवढेच मला लक्षात ठेवायचं. या देशात मी जितका वेळ राजीवजींसोबत घालवला आहे, त्यापेक्षा अधिक वेळ मी त्यांच्याशिवाय या देशात घालवला आहे. एखाद्या यंत्राप्रमाणे माझी कर्तव्य पार पडले आहेत. जोपर्यंत ताकत होती त्यांची स्वप्ने तुटू दिली नाही. या देशाला समृध्द व गौरवशाली क्षण दिले. मी घर आणि कुटुंब सांभाळलं आहे. मी जबाबदारीने आयुष्य जगले आहे. मी माझं कर्तव्य केलं आहे. राजीवजींना जी वचने मी कधीच दिली नव्हती ती देखील मी निभावली आहेत.
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2022/11/sonia-gandhi-rahul-gandhi-pc.jpg)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2022/11/sonia-gandhi-rahul-gandhi-pc.jpg)
सरकारे येतात जातात. तुम्हाला वाटतं का, आता या हरण्या जिंकण्याचा माझ्यावर काही परिणाम होत असेल?
तुमच्या शिव्या, विदेशी म्हणून मारलेले टोमणे, बारबाला, जर्शी गाय, विधवा, स्मगलर, गुप्तहेर….या सगळ्याचे मला दुःख होतं? एखाद्या टीव्ही चैनल वर दिल्या जाणाऱ्या शिव्यांनी मला दुःख होतं? ट्विटरवर आणि फेसबुकवर चालवल्या जाणाऱ्या घाणेरड्या ट्रेण्डवर मला दुःख होतं? नाही हो, मला दुःख होत नाही.वपरंतू या लोकांवर कीव जरूर येते!!
लक्षात ठेवा, ज्याच्यावर प्रेम केलं होतं. त्याचा मृतदेह पाहून दुःख होते त्यानंतर दुःख नाही होत. मन दगडाचे होऊन जाते. तुम्हाला माझ्यावर राग असेल माझा तिरस्कार करत असाल तर करा. मी आजच निघून जाईल, फक्त मला माझा राजीव परत द्या आणि जर का तुम्ही माझ्या राजीवला परत देऊ शकत नसाल तर मला शांतपणे राजीवच्या आजूबाजुला ह्याच मातीत मिसळून जाऊद्या.
या देशाच्या सुनेला एवढा हक्क तर मिळाला पाहिजे ना!
(सोनिया गांधी यांच्या पत्राचा एक भाग)
(Posted by-The unreal realities)