मराठा कुणबी जातप्रमाणपत्र कार्यपद्धती विहित करण्यासाठी समिती अध्यक्ष व सदस्यांचा २३ ऑक्टो. ला बीड येथे दौरा
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/10/IMG_20231011_191116-1024x473.jpg)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/10/IMG_20231011_191116-1024x473.jpg)
सबळ पुरावे घेऊन हजर राहण्याचे आवाहन
मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जातीचे जात प्रमाणपत्र पात्र व्यक्तींना देण्याबाबतची कार्यपध्दती विहीत करण्यासाठी गठीत समितीचे अध्यक्ष मा.न्यायमुर्ती श्री. संदीप शिंदे (निवृत्त) व समिती सदस्य यांचा बीड जिल्हा दौरा दि.23/10/2023
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/10/IMG_20231011_191146-300x212.jpg)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/10/IMG_20231011_191146-300x212.jpg)
अंबाजोगाई तालुक्यातील सर्व नागरिकांना जाहिर आवाहन करण्यात येते की, मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जातीचे जात प्रमाणपत्र पात्र व्यक्तींना देण्याबाबतची कार्यपध्दती विहीत करण्यासाठ गठीत समितीचे अध्यक्ष मा. न्यायमुर्ती श्री. संदीप शिंदे (निवृत्त) व समिती सदस्य यांचा बीड जिल्हा दौरा दि. 23/10 /2023 रोजी सकाळी 11.00 वा. जिल्हाधिकारी कार्यालय बीड येथे नियोजित आहे.
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/10/IMG_20231011_191215-1024x454.jpg)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/10/IMG_20231011_191215-1024x454.jpg)
त्याअनुषंगाने अंबाजोगाई तालुक्यातील नागरिकांनी त्यांचेकडे मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जातीचे उलेख असलेले उपलब्ध निजामकालीन पुरावे, वंशावळी, शैक्षणिक पुरावे, महसूली पुरावे, निजाम काळात झालेले करार, निजामकालीन संस्थानिकांनी दिलेल्या सनदी, राष्ट्रीय दस्तावेज इ. दस्तावेज असतील तर सदर दस्तावेज समितीसउपलब्ध करुन देणेसाठी मा. जिल्हाधिकारी बीड वा तहसील कार्यालय अंबाजोगाई येथे दाखल करावीत. जेणेकरुन सदर दस्तावेज प्रस्तुत समितीस उपलब्ध करुन देता येईल.
सदरील माहिती अंबाजोगाई येथील तहसील कार्यालयाच्या वतीने प्रसिद्धीस देण्यात आली आहे.