मनीपुर घटनेच्या निषेधार्थ अंबाजोगाईत २२ जुलै रोजी मुक मोर्चा; सलग पाच दिवस धरणार धरणे
मनीपुर घटनेच्या निषेधार्थ आज २२ जुलै रोजी दुपारी १२ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातुन मुक मोर्चा निघणार असून २२ जुलै पासून सलग पाच दिवस उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर दुपारी १२ ते ५ या कालावधीत विविध संघटनांच्या तर्फे धरणे धरण्यात येणार आहेत. या उपक्रमात सजग अंबाजोगाईकरांनी मोठ्या संख्येने सहभाग घ्यावा असे आवाहन संयोजकांनी केले आहे.
गेली दोन महिन्यापासून मणिपूर मध्ये जातीय, प्रांतिक हिंसाचार आहे. त्यात अनेक नागरिकांनी प्राण गमावले आहेत. हजारो लोक बेघर झाली आहेत. जाळपोळ आणि प्रचंड सांपत्तिक नुकसान झाले आहे.
अत्यंत खेदजनक संतापजनक अशी घटना मे महिन्यामध्ये मणिपूरमध्ये घडली . महिलांना विवस्त्र करून अत्यंत लांछनास्पद पद्धतीने त्यांच्यासोबत अत्याचार करण्यात आला. त्याचे वर्णनही करता येवू शकत नाही. अनेक महिलांच्या विवस्र धिंड काढल्या गेल्या. हा व्हिडिओ तीन महिन्यानंतर आपल्यापर्यंत आला . त्या आधी आणि नंतरही महिलांवर अत्यंत क्रूरपणे होणारे अत्याचाराच्या अनेक घटना घडल्याही असतील .मणिपूर आपला देशाचा भाग आहे आणि देशातील कोणत्याही स्त्रीवर अशा पद्धतीने अत्याचार होत असतील तर ती देशातील प्रत्येक नागरिकाला लाजवणारी आणि अपमानित करणारे कृत्य आहे. म्हणून तुम्हा सर्वांना एक विनंती आपल्याला परत एकदा एकत्र येऊन अशा प्रकारच्या विरोधात उभे राहावे लागणार आहे. त्यासाठी शनिवार दिनांक २२ जुलै रोजी सकाळी १२ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातून (मुक) निषेध मार्च काढण्यात येत आहे. आपण अंबाजोगाईकर म्हणून या मार्च मध्ये सहभागी व्हावे व मणिपूरच्या या हिंसाचाराच्या व महिला अत्याचाराच्या विरोधात सहभागी व्हावे.
हा (मुक) निषेध मार्च उपजिल्हाधिकारी कार्यालयावर जाईल. तिथे राष्ट्रपती यांना उपजिल्हाधिकारी यांच्या मार्फत निवेदन देण्यात येईल. त्यानंतर ५ वाजेपर्यंत धरणे आंदोलन करण्यात येईल. पाच दिवस हे धरणे आंदोलन चालु राहील. वेगवेगळ्या नागरी संस्था रोज १२ ते ५ वाजेपर्यंत धरणे देतील व आपला रोष व्यक्त करतील. या सर्व उपक्रमात सजग अंबाजोगाईकरांनी मोठ्या संख्येने सहभाग घ्यावा असे आवाहन संयोजकांनी केले आहे.