बीड

मतदान केंद्रात जाण्यापुर्वी ओळखीचा मुळ पुरावा सोबत ठेवावा

निवडणुक निर्णय अधिकारी यांचे आवाहन

केज विधानसभा मतदारसंघासाठी २० नोव्हेंबर २०२४ रोजी मतदान होणार असून मतदान केंद्रावर जाण्यापुर्वी मतदारांनी निवडणुक आयोगाने सांगितलेल्या १० पुराव्यापैकी कोणतेही एक ओळखपत्र आपल्या सोबत ठेवावे व आपला मतदानाचा हक्क बजावावा असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी यांनी केले आहे.

या संदर्भात प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात पुढे असे म्हटले आहे की, मा. भारत निवडणूक आयोग यांचे निर्देशानुसार 232-केज (अ.जा.) विधानसभा मतदारसंघा करिता दिनांक 20.11.2024 रोजी मतदान होणार आहे. मतदारांनी मतदान कक्षात मतदानाकरीता जात असताना मा. निवडणूक आयोगाकडील निर्देशानुसार आपल्या ओळखीचा खालीलपैकी कोणताही एक आवश्यक तो मुळ पुरावा सोबत ठेवावा, झेरॉक्स प्रत अथवा सॉफ्ट कॉपी ग्राह्य धरले जाणार नाही कृपया याची नोंद घ्यावी.

निवडणुक आयोगाने दिलेल्या सुचनाप्रमाणे मतदारांनी आपल्या सोबत मतदार ओळखपत्र, आधारकार्ड, मनरेगा जॉब कार्ड बैंक/पोस्टाचे पासबुक, ड्रायव्हींग लायसन, फोटो असलेले पेन्शनचे कागदपत्रे, खासदार/आमदार/विधानसभा सदस्य यांचेकडून देण्यात आलेले ओळखपत्र, भारतीय पासपोर्ट, पॅनकार्ड, केंद्र/राज्य सार्वजनिक उपक्रम/पब्लिक लिमीटेड सार्वजनिक कंपनीचे ओळखपत्र आपल्या सोबत ठेवावे.

याबाबत मा. जिल्हा निवडणूक अधिकारी अविनाश पाठक यांनी तसेच निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी दीपक वजाळे यांनी केज मतदारसंघातील जनतेला वरील पुराव्याच्या आधारे मतदान करण्याचे आवाहन केले आहे.

Sudarshan Rapatwar

महाराष्ट्रातील प्रगल्भ पत्रकार मराठवाड्यातील पत्रकारितेला एक नवा आयाम देण्याचा त्यांचा यशस्वी प्रयत्न असतो. गावातील पत्रकारिता जिल्ह्यात, राज्य आणि देश पातळीवर नेण्यात त्यांचे मोठे योगदान आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker