मणिपुर : जातीय हिंसा करणा-या गुन्हेगारांना फासावर लटकवा
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/07/IMG-20230724-WA0264-1024x466.jpg)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/07/IMG-20230724-WA0264-1024x466.jpg)
अत्याचार विरोधी आंबेडकरी व डावे यांची प्रतिरोध समितीची निदर्शने
मणिपुर मधील जाती हिंसा थांबवून केंद्र सरकारने तेथील राज्य सरकार बरखास्त करावे, कुकी आदीवासी महिलांची नग्न धिंड काढणार्या जमावावर त्यांना ट्रेस करून गुन्हे दाखल करावेत या गुन्हेगारांना फासावर लटकवा या प्रमुख मागणीसाठी अंबाजोगाईत सोमवार, दि. 24 जुलै रोजी अत्याचार विरोधी आंबेडकरी व डावे यांची प्रतिरोध समितीच्या वतीने अंबाजोगाई येथील उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी करून निदर्शने करून निवेदन देण्यात आले.
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/07/IMG-20230724-WA0265-1024x461.jpg)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/07/IMG-20230724-WA0265-1024x461.jpg)
अत्याचार विरोधी आंबेडकरी व डावे यांची प्रतिरोध समितीच्या वतीने सोमवारी अंबाजोगाईत जोरदार निदर्शने करण्यात आली. यावेळी उपजिल्हाधिकार्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गेल्या अडीच महिन्यांपासून मणिपूर जळत आहे, केंद्र सरकारने कुकी आदिवासींचे आरक्षण गैर आदिवासी मतई जातीस देणे बाबत आश्वासन देऊन दोन भिन्न जात जमातीत आग लावली, संपुर्ण देशात लोकांचे जिवन जगण्याचे प्रश्न सोडून हिंदु, मुसलमान, हिंदु, खिश्चन आणि हिंदु, मधल्या मागास जाती यांच्यात जातीय, धार्मिक आणि समाजिक विष पेरून एक प्रकारचा सांप्रादायीक उन्माद निर्माण केला आहे.
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/07/IMG-20230724-WA0263-1024x461.jpg)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/07/IMG-20230724-WA0263-1024x461.jpg)
परिणामी देश जात आणि धर्माच्या विद्वेषात जळत आहे. परिणामी, आदिवासींचे 300 प्रार्थना स्थळे जाळली गेली, 50 हजार घरे जाळून खाक केली, असंख्य माणसे कॅम्पमध्ये आश्रयास आहेत, राज्य सरकारने या हिंसेला आणि अराजकास फूस लावून माणसापासून माणूस परका केला. मे महिन्यात मैतेई समूहाने तीन महिलांचे अपहरण करून बलात्कार तर केलाच पण त्या आधी त्याची विवस्त्र धिंड काढली. देशात आणि राज्यात लोकशाही आणि सांवैधनिक संस्थांची मोडतोड करून भारतीय संविधानाला नख लावणे सुरू आहे. या निदर्शनानिमित्त आम्ही मणिपूर राज्य बरखास्त करून तेथील दंगाई व गुन्हेगारांना फासावर लटकविण्याची मागणी करीत आहोत असे निवेदनात म्हटले आहे.
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/07/IMG-20230724-WA0266-1024x722.jpg)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/07/IMG-20230724-WA0266-1024x722.jpg)
निवेदन देण्यापुर्वी उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. यावेळी निदर्शकांना कॉ.बब्रुवाहन पोटभरे, शैलेश कांबळे, अॅड.विलास लोखंडे, मारोती माने, अशोक पालके, धिमंत राष्ट्रपाल, कॉ.गुलनाज, शारदा जाधव यांनी संबोधित केले.
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/07/IMG-20230724-WA0267-1024x768.jpg)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/07/IMG-20230724-WA0267-1024x768.jpg)
अत्याचार विरोधी आंबेडकरी व डावे यांची प्रतिरोध समितीच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनावर ज्येष्ठ नेते कॉ.बब्रुवाहन पोटभरे, शैलेश कांबळे, ऍड.विलास लोखंडे, मारोती माने, अशोक पालके, धिमंत राष्ट्रपाल, कॉ.गुलनाज, शारदा जाधव, शेख रशिदा, शुभम बनसोडे,बाबा शेख सलीम, अरूण वेडे, बापू गोमसाळे, गोरखसिंग भोंड, सय्यद रईसोद्दीन, महादेव गव्हाणे, ऍड.दिलीप गोरे, अमोल पौळे, गोविंद मस्के, ऍड.कासारे, ऍड.रोडे, कॉ.भागवत जाधव, रशिद भाई, वृक्षमित्र सुधाकर देशमुख, कॉ.मसरत, सुरज लोंढे, रईस शेख,समीर शेख यांच्यासह अनेकांच्या स्वाक्षर्या आहेत. निदर्शनात मोठ्या प्रमाणावर महिला भगिनी, आंबेडकरी चळवळीतील युवक, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले.