मंगेश सुरवसे यांची महाराष्ट्र नर्सेस फेडरेशनच्या सहसचीवपदी निवड


महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस फेडरेशनचे १९ व्या राज्यव्यापी दोन दिवसीय अधिवेशनात मंगेश सुरवसे यांची महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस फेडरेशनच्या राज्य सहसचिवपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे.महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस फेडरेशनचे १९ वे दोन दिवसीय राज्यव्यापी अधिवेशन कोल्हापूर येथे दिनांक १३ व १४ ऑगस्ट २०२२ रोजी उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले.
या अधिवेशनाचे उद्घाटन प्रमुख पाहुण्या कोल्हापूर राजघराण्यातील छत्रपती श्रीमंत मधुरिमाराजे मालोजीराजे यांच्या हस्ते संपन्न झाले. राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचे जिल्हा सरचिटणीस अनिल लवेकर, पदाधिकारी वसंत डावरे, कोल्हापूर नर्सिंग कॉलेजच्या शुश्रुषा अधिकारी श्रीमती शिल्पा घाटगे यांची अधिवेशनास प्रमुख उपस्थिती होती.
महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस फेडरेशनचा रोमांचकारी वातावरणामध्ये निवडणूक पार पडल्या. यामध्ये बिनविरोध अध्यक्ष श्रीमती. इंदुमती थोरात तर सहसचिवपदी श्री. मंगेश सुरवसे यांची निवड झाली.
मंगेश सुरवसे यांची महाराष्ट्र राज्याचा सहसचिवपदी निवड झाल्याबद्दल
स्वामी रामानंद तीर्थ वैद्दकीय रुग्णालयांतअधिसेविका कार्यालयात अधिसेविका श्रीमती उषा भताने मॅडम यांनी सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यावेळी अधिसेविका कार्यालयामधील सर्व कर्मचारी व परिचारिका सेवा संघ अंबाजोगाई चे सर्व पदाधिकारी व सदस्य या कार्यक्रमास उपस्तिथ होते.
▪️
संघटनेने माझ्यावर सोपवलेल्या जवाबदारीचे मी प्रामाणिकपणे पालन करण्याचा प्रयत्न करणार असुन सहकारी बांधवावर होणाऱ्या अनन्याय विरोधात लढा उभारुण न्याय मिळवून देण्यासह दिवसरात्र सुख दुःखात तनमन धनाने नेहमी अग्रेसर राहणार आहे.