अंबाजोगाई येथील श्रीमती मंगला अरुणराव भुसा यांना लातूर येथे झालेल्या 34 व्या महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघ (फेस्कॉम) च्या अधिवेशनात माननीय सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते फेसकॉम चे अध्यक्ष अण्णासाहेब टेकाळे, सचिव चंद्रकांत महामुनी, डॉक्टर भराटे, जिल्हा समाजकल्याण अधिकारी शिवकांत चिकुर्ते, उपाध्यक्ष अशोक तेरकर, अरुण रोडे,लातूर ज्येष्ठ नागरिक संघाचेआर.बी.जोशी, बी आर. पाटील आदींच्या प्रमुख उपस्थितीत महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघ मुंबई ( फेसकॉम) च्या ‘आदर्श माता ‘ यां राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले .
श्रीमती मंगल भुसा या 74 वर्षाच्या जेष्ठ,हिंदी भाषेची पंडित पदवी प्राप्त असून गोदावरी कुंकूलोळ योगेश्वरी कन्या प्रशाला अंबाजोगाई येथे शिक्षिका म्हणून 39 वर्ष कार्य करून सेवानिवृत्त झालेळ्या आहेत 2010 पासून त्या ज्येष्ठ महिला नागरिक संघात विविध पदावर कार्यरत असून विविध सामाजिक व धार्मिक कार्यात सक्रिय आहेत.
त्यांनी आपल्या प्रापंचींक जीवनात पतीचे आजारपण, पती व जावयाचा अकाली मृत्यू, नैराश्य व दुःख अशा अनेक संकटांना तोंड देत न डगमगता आपली दोन मुले व दोन मुली यांना उच्चशिक्षित व सक्षम बनवले तसेच आपले समाजसेवेचे वृत्तही अव्याहत चालू ठेवले .
त्यांच्या यां माता म्हणून केलेल्या आदर्शवत संघर्षाची दखल घेत त्यांना फेसकॉमच्या राज्यस्तरीय आदर्श माता पुरस्काराने गौरवण्यात आले आहे.
फेस कॉम दक्षिण मराठवाडा विभागाचे अध्यक्ष डॉ. दामोदर थोरात, सचिव जगदीश जाजू, ज्येष्ठ नागरिक संघ अंबाजोगाई चे अध्यक्ष ऍड. अनंतराव जगतकर, कार्याध्यक्षा डॉ. सुलभा खेडगीकर व सचिव लक्ष्मण गोरे यांनी त्यांचे विशेष अभिनंदन केले आहे.
महाराष्ट्रातील प्रगल्भ पत्रकार मराठवाड्यातील पत्रकारितेला एक नवा आयाम देण्याचा त्यांचा यशस्वी प्रयत्न असतो. गावातील पत्रकारिता जिल्ह्यात, राज्य आणि देश पातळीवर नेण्यात त्यांचे मोठे योगदान आहे.