भुकंप नाही; भुगर्भातील हवेच्या पोकळी मुळे झाला आवाज
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2024/02/img_20240206_2200435682393073120743555-1024x574.jpg)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2024/02/img_20240206_2200435682393073120743555-1024x574.jpg)
राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाची माहिती
बीड शहर आणि शहरालगत ची अनेक गावे आज ६ फेब्रुवारी रोजी रात्री ८ वाजून २१ मिनिटांनी एका मोठ्या आवाजाने हादरून गेला.
बीड शहरात या आवाजाने अनेक ठिकाणी जमीन, घरावरील पत्रे, खिडकीच्या दरवाजांची पटे हलली असल्याचे अनेक जण सांगताहेत. हा आवाज भुकंप होण्यापूर्वी कांहीं सेकंद आधी जाणवतो तसा होता आणि भुकंप होतांना ज्या पध्दतीने जमीन हदरल्ल्याची जाणवते त्याच पध्दतीने या घटना आवाजासोबतच घडल्यामुळे बीड शहर आणि परिसरातील अनेक गावांत काही काळ भिंतीचे वातावरण निर्माण झाले होते.
हा आवाज नेमका कशाचा यांची माहिती घेण्यासाठी बुड जिल्हा प्रशासनाने तातडीने राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाशी संपर्क साधून या संदर्भातील अधिक माहिती घेतली.
या संदर्भात भुगर्भ शास्त्रज्ञ रोहन पवार यांनी महसूल प्रशासनाला माहिती देताना सांगितले की, “भुगर्भातील पाण्याची पातळी कमी झाल्यानंतर आत हवेची एक पोकळी निर्माण होते. या पोकळीत हवेचा दाब निर्माण होतो. या हवेच्या दाबामुळे अनेक ठिकाणी भुगर्भात असे बदल होतात तेथे असे मोठे आवाज होतात. या आवाजाचा व भुकंपाचा काहीही संबंध नाही, म्हणून नागरीकांनी भिंती बाळगण्याचे कारण नाही.” असे त्यांनी सांगितले आहे.