भारत बांगलादेश सद्भावना सायकल यात्रेत दगडु लोमटे घेणार सहभाग
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/09/IMG_20230915_134752-1024x1024.jpg)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/09/IMG_20230915_134752-1024x1024.jpg)
भारत आणि बांगलादेश या दोन देशांमध्ये सद्भाव निर्माण करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या भारत बांगलादेश सद्भावना सायकल यात्रेत अंबाजोगाई येथील सामाजिक कार्यकर्ते, साहित्यिक-कवी दगडु लोमटे हे सहभागी होणार आहेत. भारतातील कोलकता ते बांगलादेश मधील नौखाली या दरम्यान ही सद्भावना यात्रा १४ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत निघाली आहे.
ही सद्भावना सायकल यात्रा भारताच्या स्वातंत्र्याला ७५ वर्षे आणि बांगलादेश स्वातंत्र्याला ५० वर्ष पूर्ण होत आहेत यानिमित्ताने काढली जात आहे. विशेष हे की ज्या इंग्रजांनी भारताला पारतंत्र्यात ठेवले त्या इंग्लंड देशाचे दोन प्रतिनिधी यात सहभागी होत आहेत. दोन्ही सदस्य तिथल्या सिनेमातील लोकप्रिय कलावंत आहेत.
ही सद्भावना सायकल यात्रा दिनांक १४ सप्टेंबर रोजी कलकत्ता येथून निघेल व २ ऑक्टोबर गांधी जयंती रोजी गांधी आश्रम नौखाली येथे सांगता करणार होईल.
एकूण २० दिवसांची ही सद्भावना सायकल यात्रा आहे. सद्भावना सायकल यात्रा गेल्या दोन वर्षां पूर्वी अहमदनगर ते नौखाली अशी काढण्यात आली. स्नेहालय या संस्थेच्या पुढाकाराने व भारतातील अनेक संस्थांच्या सहकार्याने काढण्यात आली होती. या वर्षी ती कलकत्ता येथून काढण्यात येत आहे. एकूण १३० जण यात सहभगी होत आहेत तर ७० सायकल यात्रीं यात सहभागी होणार असून कांहीं ज्येष्ठ सदस्य त्यात असतील. इतर ६० लोक दोन टप्प्यात सहभागी होतील. त्यातील कांहीं सदस्य २२ सप्टेंबर रोजी मालदा पश्चिम बंगाल येथे सामील होतील तर इतर सदस्य आगरतला त्रिपुरा येथून बांगला देश येथे येथील.
गिरीश कुलकर्णी यांच्या संकल्पनेतून ही यात्रा मेहेरबाबा संस्थान, स्व . बाबा आमटे, स्व. एस एन सुब्बा राव, अण्णा हजारे यांच्या प्रेरणेतून काढीत आहेत. पोपटराव पवार, दगडू लोमटे, असीम सरोदे, श्याम असावा, संजय गुगळे, भूषण देशमुख, नरेंद्र मेस्त्री यांचा यात सहभागी असणार आहेत.
अनेक तरुण तरुणी या सायकल यात्रेत असून. ठिक ठिकाणच्या सामाजिक संस्थांना भेटी देणार आहेत. अनेक संस्था, भारत सरकार, पश्चिम बंगाल सरकार आणि बांगलादेश सरकार व भारतातील व बांगला देश येथील गांधीवादी संस्था सहकार्य करीत आहेत.