महाराष्ट्र

भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिका चे काम पुर्णत्वाकडे

लवकरच होणार लोकार्पण; डॉ. उत्कर्ष गुट्टे


भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३ व्या जयंतीनिमित्त गेली अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिकेचे काम पुर्णत्वाकडे आले असून लवकरच ही अभ्यासिका सर्वांसाठी खुली करण्यात येईल अशी माहिती नगर परिषदेचे मुख्याधिकारी डॉ. उत्कर्ष गुट्टे यांनी दिली.
अंबाजोगाई शहर हे शैक्षणिक दृष्ट्या महत्वाचे शहर असून या शहरातील सर्वसामान्य विद्यार्थ्यांना शहराच्या मध्यवर्ती भागात एक सुसज्ज अभ्यासिका असावी या दृष्टिकोनातून नगर परिषदेच्या जलतरण तलावाच्या शेजारी एक अद्यावत अभ्यासिका निर्माण करण्याचे काम गेली काही वर्षांपासून सुरु होते. मात्र या आभ्यिसिकेच्या कामाला तांत्रिक बाबींमुळे विलंब होत होता.


शहरातील गरजवंत विद्यार्थ्यांची अभ्यासिकेची ही अडचण लक्षात घेऊन नगर परिषदेच्या वतीने सुरु असलेल्या या अभ्यासिकेच्या कामाला गती देण्याच्या सुचना या विभागाच्या आ. नमिता मुंदडा यांनी दिल्यानंतर या अभ्यासिकेचे काम युध्दपातळीवर सुरु करुन हे काम आता पुर्णत्वाकडे गेले असल्याचे त्यांनी सांगितले.
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३ व्या जयंतीनिमित्त “भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिका” सुरु करावयाची होती, मात्र या अभ्यासिकेचे काम अजूनही पुर्ण न झाल्याने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती चे औचित्य साधुन “भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिका” या फलकाचे अनावरण आज करण्यात येवून लवकरच ही अभ्यासिका सर्वांसाठी खुली करण्यात येणार असल्याचे नगर परिषदेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी डॉ उत्कर्ष गुट्टे यांनी सांगितले.

आ. नमिता मुंदडा यांनी केला पाठपुरावा

अंबाजोगाई नगर परीषदेच्या वतीने सुरु करण्यात येत असलेल्या “भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिका” चे कामास गती देण्याच्या सुचना आ. नमिता मुंदडा यांनी केल्या होत्या. त्या स्वतः इंटेरियर डिझायनींग या विषयातील उच्च शिक्षित असल्यामुळे त्यांनी ही अभ्यासिका अधिक अद्ययावत, मुलांच्या सोयीची व वैशिष्ट्य पुर्ण कशी होईल या बाबतच्या सुचेना केल्या आहेत. गेली अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली ही अभ्यासिका सुरू करण्यासाठी आ. नमिता मुंदडा यांनी घेतलेल्या पुढाकाराचे शिक्षणप्रेमी व विद्यार्थी वर्गाकडून स्वागत करण्यात येत आहे.

Sudarshan Rapatwar

महाराष्ट्रातील प्रगल्भ पत्रकार मराठवाड्यातील पत्रकारितेला एक नवा आयाम देण्याचा त्यांचा यशस्वी प्रयत्न असतो. गावातील पत्रकारिता जिल्ह्यात, राज्य आणि देश पातळीवर नेण्यात त्यांचे मोठे योगदान आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker