भाजपा समर्थकातील मतभेद मिटविण्यात अक्षय मुंदडा यांना यश
आ. नमिता मुंदडा यांचा विधानसभा सभेचा मार्ग झाला सुखकर
केज विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केज विधानसभा मतदारसंघात गेली अनेक वर्षांपासून भाजपा समर्थक व विद्यमान आ. नमिता मुंदडा यांच्या कार्यकर्त्यांमध्ये असलेला वाद मिटवण्यात अक्षय मुंदडा यांना यश आले आहे. यामुळे या निवडणुकीत मुंदडा यांच्या विजयाच्या मार्ग सुखकर झाला असल्याची चर्चा होते आहे.
केज विधानसभा मतदारसंघाच्या २०१९ च्या निवडणुकीपर्वी अचानक राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये असलेल्या व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची उमेदवारी जाहीर झालेल्या नमिता मुंदडा यांनी आपल्या हजारो समर्थकांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जाहीर केलेली उमेदवारी नाकारुन तत्कालीन पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाखाली आपल्या हजारो समर्थकांसह भारतीय जनता पक्षात प्रवेश केला व उमेदवारी मिळवली. पंकजा मुंडे यांच्या आदेशानुसार २०१९ च्या निवडणुकीत सर्व मुंडे समर्थकांनी मुंदडा यांचा प्रचार करुन त्यांना विजयी केले.
मात्र विजयानंतर एक-दोन वर्षानंतर मुंदडा आणि भाजपा समर्थकांत दरी निर्माण झाली.
मुंदडा समर्थक वा मुंदडा परिवार आपल्यावर अन्याय करीत आहे ही भावना मोठ्या प्रमाणात निर्माण झाली. २०२४ च्या निवडणुकीपुर्वी हा वाद अधिकच गडद करण्याचा प्रयत्न अनेकांनी केला.
अक्षय मुंदडा यांनी घेतला पुढाकार!
मात्र हा वाद मिटविण्यासाठी अक्षय मुंदडा यांनी पुढाकार घेतला. भाजपाच्या राष्ट्रीय सचीव पंकजा मुंडे, भाजपाचे नेते राजेश कराड यांच्या मध्यस्थीने त्यांनी या सर्व असंतुष्ट कार्यकर्त्यांना एकत्र आणत राजेश कराड यांच्या निवासस्थानी एक व्यापक बैठक बोलावली व हा सिमेंट घडवून आणला.
कुटुंबात वाद झाला तर कुटुंब तोडायचे का?
या बैठकीत कार्यकर्त्यांनी आपल्या तीव्र भावना अक्षय मुंदडा, राजेश कराड यांच्या समोर मांडल्या. मात्र सध्याच्या परिस्थितीत आप आपसातील मतभेदापेक्षा ही जिल्ह्यात निर्माण झालेल्या जातीय समिकरणात भाजपा समर्थकांनी भाजपाच्या मागे आपली शक्ती उभी करणे हे किती महत्त्वाचे आहे हे लक्षात आणून देत आपल्या कुटुंबात वाद निर्माण झाला तर संपुर्ण कुटुंब तोडायचे का? असे सांगत राजेश कराड यांनी संयमाची भुमिका घेण्याचे आवाहन केले.
या पुढे कोणत्याही कार्यकर्त्यांवर अन्याय होणार नाही याची काळजी घेवू!
अक्षय मुंदडा यांनी घेतलेल्या संयमी आणि समजदार राजकारणाने घ्यावी तशी भूमिका घेतली. यापुढे कोणत्याही कार्यकर्त्यांवर अन्याय होवू दिला जाणार नाही व केला जाणार नाही असा शब्द दिल्यामुळे भाजपा समर्थकांनी मुंदडा परिवारा विरोधात असलेली आपली भुमिका मागे घेत या निवडणुकीत पुन्हा एकदा समाजाची सर्व शक्ती भाजपाच्या उमेदवार आ. नमिता मुंदडा यांच्या मागे उभी करण्याचा शब्द दिल्यामुळे ही निवडणूक नमिता मुंदडा यांच्या साठी सुकर झाली असल्याचे सांगितले जाते.