भाजपा वैद्यकीय आघाडी महाराष्ट्र प्रदेश कोर समितीची बैठक महाराष्ट्र भाजपा प्रदेशाध्यक्ष श्री चंद्रशेखरजी बावनकुळे यांच्या प्रमुख अध्यक्षतेखालील उपस्थितीत संपन्न


सेवा सप्ताह व रुग्ण मित्र अभियानाचे महाराष्ट्रात तळागाळापर्यंत जाऊन यशस्वी आयोजन करण्यासंदर्भात नियोजन
मुंबई प्रदेश कार्यालय येथे भाजपा वैद्यकीय आघाडी महाराष्ट्र प्रदेश कोर समितीची बैठक भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष माननीय श्री चंद्रशेखरजी बावनकुळे यांच्या प्रमुख अध्यक्षतेखालील उपस्थितीत संपन्न झाली. या बैठकीमध्ये मुख्य प्रदेश प्रवक्ते तथा प्रदेश समन्वयक डॉ स्वप्नील बी. मंत्री यांनी रुग्ण मित्र अभियान व सेवा सप्ताह संबंधी राज्यभरात सुरु असलेल्या तयारी संबंधीचा सविस्तर आढावा मांडला. प्रदेश सहसंयोजक डॉ राहुल कुलकर्णी यांनी आगामी वैद्यकीय आघाडीची रचना कशी असावी यासंबंधी मत व्यक्त केले. प्रदेश संयोजक डॉ बाळासाहेब हरपळे यांनी आगामी रुग्ण मित्र अभियान तसेच सेवा सप्ताह यशस्वी करण्यासाठी सर्वांनी अथक प्रयत्न करण्याचे आवाहन केले.
भाजपा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष व भाजपा वैद्यकीय आघाडी महाराष्ट्र प्रभारी डॉ अजित गोपछडे यांनी रुग्ण मित्र अभियानची सविस्तर माहिती देऊन या अभियानाला जिल्हा परिषद, ग्रामपंचायत स्तरावर कशा पद्धतीने राबवायचे यासंबंधी मार्गदर्शन केले.


बैठकीला मार्गदर्शन करत असताना प्रदेशाध्यक्ष श्री चंद्रशेखरजी बावनकुळे यांनी रुग्ण मित्र अभियान मध्ये संपुर्ण महाराष्ट्रात एक लाख रुग्णमित्र नोंदणी करून हे अभियान वैद्यकीय आघाडीच्या प्रदेश, विंग, विभाग, केमिस्ट अॅण्ड फार्मसी विंग, जिल्हा, तालुका पदाधिकारी यांनी यशस्वी करण्याचे आवाहन करून सेवा सप्ताह मध्ये प्रत्येक जिल्ह्यात मंडळावर 5 आरोग्य शिबिरे, जिल्हा स्तरावर रक्तदान शिबिर आयोजन, पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली कार्यक्रम व महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त स्वच्छ भारत अभियान तसेच विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्याचे आवाहन केले व भारतीय जनता पार्टी वैद्यकीय आघाडीचे संघटन मजबूत करून देशात व राज्यात भाजपची सत्ता आणण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले.
या बैठकीमध्ये भाजपा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष आ. सौ माधवी नाईक यांनी सुद्धा आपले विचार मांडले.
यावेळी भाजपा वैद्यकीय आघाडीचे प्रदेश सहसंयोजक डॉ प्रशांत पाटील, प्रदेश सहसंयोजक डॉ सचिन उमरेकर, समन्वयक डॉ विष्णू बावणे, तसेच केमिस्ट अॅण्ड फार्मसी विंग प्रदेश संयोजक श्रीकांत दुबे, आयुर्वेद विंग प्रदेश संयोजक डॉ उज्वला हाके, स्वास्थ स्वयंसेवक अभियान प्रदेश समन्वयक डॉ उज्वला दहिफळे, होमिओपॅथी विंग प्रदेश संयोजक डॉ भालचंद्र ठाकरे, डेंटल विंग प्रदेश संयोजक डॉ गोविंद भताने, आयुर्वेद विंग प्रदेश सहसंयोजक डॉ मंजुषा दराडे, आयुर्वेद विंग प्रदेश सहसंयोजक डॉ शाम पोटदुखे, डेंटल विंग प्रदेश समन्वयक डॉ रूपाली धर्माधिकारी, नॅचरोपॅथी प्रदेश संयोजक डॉ सुनील चव्हाण, ठाणे जिल्हा संयोजक डॉ महेश जोशी, डॉ अपर्णा शिंदे, डॉ अपर्णा झोडगे, मुंबई विभाग सहसंयोजक डॉ कृष्णा व्होरा, उपस्थित सर्व पदाधिकाऱ्यांनी आगामी अभियान संबंधी समायोचीत सूचना केल्या.

