राष्ट्रीय
भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांच्या वर पैसे वाटल्याचा आरोप

पैसे वाटल्याचा व्हिडिओ व्हायरल
भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांना विरार मतदार संघात मतदारांना पैसे वाटल्याचा आरोप विरार मतदार संघातील बहुजन विकास आघाडीचे उमेदवार हितेश ठाकूर यांनी केला आहे.
विधानसभा सभा निवडणुकीसाठी उद्दा मतदान होणार असतांनाच आज सकाळी विरार मतदार संघात भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी पैसे वाटल्याचा आरोप याच मतदार संघातील बहुजन विकास आघाडीचे उमेदवार हितेश ठाकूर यांनी केला आहे.

भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे हे आज सकाळी विरार मतदार संघातील विरार पूर्व भागातील हॉटेल विवांता मध्ये भाजपाचे उमेदवार राजन नाईक यांना भेटण्यासाठी गेले होते. यावेळी भाजपा कार्यकर्त्यांना पैसे वाटप करतांना आढळून आल्याचा आरोप बहुजन विकास आघाडीचे उमेदवार हितेश ठाकूर यांनी केला. सदरील पैसे वाटप चालू असताना बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्ते या हॉटेलमध्ये गेले आणि त्यांनी पैसे वाटप करीत असल्याचा व्हिडिओ व्हायरल केला व या प्रकरणी पोलिसांकडे तक्रार ही केली.


