महाराष्ट्र

भाग्यश्री देशपांडे यांना वसंतराव देशपांडे फाऊंडेशनचा पुरस्कार जाहीर

डॉ. वसंतराव देशपांडे मेमोरियल फाउंडेशन, चिंचवड, पुणे. या संस्थेतर्फे दिला जाणारा डॉ. वसंतराव देशपांडे पुरस्कार महाराष्ट्रातील शास्त्रीय गायनातील प्रथितयश व संगीत क्षेत्रात विशेष प्रगती करणाऱ्या कलावंताला दिला जातो. यावर्षी या पुरस्कारासाठी मुंबई येथील सौ. भाग्यश्री देशपांडे–पाटील यांची निवड करण्यात आली आहे.

६ मे ला होणार वितरण

शास्त्रीय गायनातील अतिशय प्रतिष्ठेचा समजल्या जाणाऱ्या या पुरस्काराचे स्वरूप शाल, श्रीफळ, स्मृतीचिन्ह व रोख रक्कम असे आहे. हा पुरस्कार दिनांक 6 मे 2023 रोजी सायंकाळी सहा वाजता प्रा. रामकृष्ण मोरे सांस्कृतिक सभागृह, चिंचवड, पुणे. येथे मान्यवरांच्या उपस्थितीत आणि मान्यवरांच्या हस्ते सौ. भाग्यश्री देशपांडे– पाटील यांना प्रदान करण्यात येणार आहे.
पुरस्कार वितरण कार्यक्रमानंतर पुरस्कार प्राप्त कलावंताचे शास्त्रीय गायन पण होणार आहे त्यांना हार्मोनियम व तबला साथ अनुक्रमे उपेंद्र सहस्त्रबुद्धे व विघ्नहरी देव हे करणार आहेत असे फाउंडेशनचे अध्यक्ष तथा कार्यकारी विश्वस्त ज्येष्ठ संगीत तज्ञ, गायक तसेच नाट्य कलावंत रवींद्रजी व सौ. वंदनाजी घांगुर्डे यांनी प्रसिद्धी पत्राव्दारे कळवले आहे. रसिकांनी या कार्यक्रमास आवर्जून उपस्थित असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात येत आहे.

अंबाजोगाईतून आभिनंदनाचा वर्षाव!

संगीत क्षेत्रात अत्यंत कमी वयात अलौकिक यश संपादन केलेल्या अंबाजोगाईच्या भुमी कन्या सौ. भाग्यश्री देशपांडे हीस पं. वसंतराव देशपांडे यांच्या नावाचा शास्त्रीय संगीत गायनाचा पुरस्कार मिळाल्याची वार्ता शहरात दाखल होताच माजी मंत्री पंडीतराव दौंड, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते नंदकिशोर मुंदडा, हिंदी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी, आ. नमिता मुंदडा, माजी आमदार संजय दौंड. प‌थ्वीराज साठे, पं. उध्दवबापु आपेगावकर, पं. प्रकाश बोरगावकर, संगीतकार ओंकार रापतवार आदिंची भाग्यश्री देशपांडे यांच्या यशाचे कौतुक केले आहे.

Sudarshan Rapatwar

महाराष्ट्रातील प्रगल्भ पत्रकार मराठवाड्यातील पत्रकारितेला एक नवा आयाम देण्याचा त्यांचा यशस्वी प्रयत्न असतो. गावातील पत्रकारिता जिल्ह्यात, राज्य आणि देश पातळीवर नेण्यात त्यांचे मोठे योगदान आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker