भाग्यश्री देशपांडे यांच्या गायनाने गुणीजान संगीत समारोहाची सांगता


शेवटच्या सत्रात येथील आश्वासक युवा गायिका भाग्यश्री देशपांडे हिने सुश्राव्य गायन केले आलापी आणि स्वरांवरील मजबुत पकड हे भाग्यश्रीच्या गायनाचे वैशिष्टय तिने अप्रतिम गायन सादर करून त्या आठवणींना उजाळा दिला.
संतूर असे फारशी नाव धारण केलेल्या या वाद्याचे भारतातील खरे नाव शततंत्रीवीना असे आहे. काश्मीरच्या लोक संगीतामध्ये या वाद्याचा पूर्वीपासून वापर केला जायचा. विशेष करून सुफी संगीतामध्ये संतूर वाद्याला विशेष महत्त्व होते. कलावंतांनी या काश्मीरी वाद्याला लोकप्रियता मिळवून दिली.
अंबाजोगाईतील गुनीजान संगीत समारोहाच्या निमित्ताने सतीश व्यास यांचे बहारदार संतूरवादन रसिकांना ऐकण्याची संधी मिळाली आणि या वाद्याची जवळून ओळख झाली. सतीश व्यास यांनी मैफलीच्या प्रारंभी सादरीकरण केले हिंदुस्तानी शास्त्रीय संगीतात रागदारीचे महत्व आहे. विशेष करून वाद्य संगीतामध्ये या राग दारीचे प्रस्थ अधिकच आहे. त्यामुळे रसिकांच्या मनावर कलावंताला पकड घ्यायला सोपे जाते असे मानले जाते. त्यात प्रकृती आणि संस्कृती यांची तयारी लाजवाब असल्यामुळे रसिकांना हे रागदारी वादन अधिकच भावले. संतूर या वाद्यावर मिंड हा प्रकार काहीसा अवघडच परंतु व्यास यांनी आलापी करत असताना उत्तम प्रकारे मिंडयुक्त आलापी सादर केली. संतुर हे वाद्य वादनासाठी अवघडच पण ” जो रियाज करेगा वही राज करेगा”. या प्रमाणे सतीशजींच्या यांच्या संतूर वादनांमध्ये क्षणोक्षणी प्रचंड रियाज जाणवत होता. तिन्ही सप्तकामध्ये त्यांची लीलया चालणारी बोटे रसिकांना आवाक करत होती. आलापी नंतर संतूर वर वाजवला गेलेला जोड हा प्रकार म्हणजे रसिकांसाठी पर्वणीच होती. अंबाजोगाईच्या रसिकांना संतूर आणि तबला वादन अशी बहारदार जुगलबंदी प्रथमच ऐकायला मिळाली गुनिजान संगीत समारोह म्हणजे अंबाजोगाईतील रसिकांसाठी पर्वणीच होती.