“बॉम म्युझिक स्कुल” शहराच्या सांगितिक क्षेत्रातील नवे पाऊल!


नंदकिशोर मुंदडा यांचे मत
ओंकार रापतवार याच्या बॉम म्युझिक स्कुलचे उद्घाटन हे शहराच्या सांगितिक क्षेत्रातील नवे पाऊल आहे असे मत ज्येष्ठ समाजसेवक नंदकिशोर मुंदडा यांनी व्यक्त केले.
संगीत क्षेत्रातील अद्ययावत ज्ञान मिळवून शहरातील संगीतप्रेमी मुलांना पिढीजात संगीत वाद्दासह उच्च तंत्रज्ञानाच्या साहाय्याने विकसीत झालेल्या संगीत वाद्यांचे अत्याधुनिक पद्धतीने शिक्षण देणारी ओंकार रापतवार याने सुरु केलेली बॉम म्युझिक स्कुल च्या उद्घाटन कार्यक्रमात नंदकिशोर मुंदडा बोलत होते. यावेळी व्यासपीठावर ओंकार रापतवार यांच्या आज्जी चंद्रकला रापतवार, जुन्या पिढीतील प्रख्यात गायीका सौ. राणी वडगावकर, मानवलोकचे कार्यवाह अनिकेत लोहिया, ज्ञान प्रबोधिनी चे संचालक प्रसाद दादा चिक्षे, प्रख्यात शल्य चिकित्सक डॉ. सिध्देश्वर बिराजदार, योगेश्वरी शिक्षण संस्थेचे सचीव गणपत व्यास, निशाद अकादमीचे संचालक प्रकाश बोरगावकर, प्रख्यात गायक अभिजित जाधव, माजी उपनगराध्यक्ष मनोज लखेरा व इतर मान्यवर उपस्थित होते.
आपल्या विस्तारीत भाषणात नंदकिशोर मुंदडा पुढे म्हणाले की, अंबाजोगाई शहराला जसा शैक्षणिक, सामाजिक वारसा इतिहास आहे तसा सांगीतिक इतिहास ही आहे. या शहरात राजा जैतपाल यांच्या राज्याच्या पुर्वीपासुन सांगीतिक इतिहास असल्याचे सांगितले जाते. आता सांगीतिक क्षेत्रातील नव्या बदलानुसार नवनवीन अत्याधुनिक वाद्दाने संगीत क्षेत्रात आपली जागा निश्चित केली आहे. यासर्व अत्याधुनिक संगीत वाद्यांचे शिक्षण देणारी म्युझिक स्कुल या शहरात व पंचक्रोशीत नव्हती यांची उणीव आता ओंकार रापतवार याने बॉम म्युझिक स्कुल घ्या उद्घाटनाने दुर केली असल्याचे त्यांनी सांगितले.


या कार्यक्रमात ज्येष्ठ गायिका सौ. राणी वडगावकर, ज्ञानप्रबोधिनी चे संचालक प्रसाद दादा चिक्षे यांनी ओंकार रापतवार यांच्या सांगितीक प्रवासाला शुभेच्छा दिल्या तर प्रख्यात -हदयतज्ञ डॉ. सिध्देश्वर बिराजदार यांनी संगीत आणि माणसाचे आरोग्य व आजार यांचे संबंध सांगत माणसाच्या जीवनात संगीत किती महत्वाचे आहे हे सांगितले. प्रकाश बोरगावकर यांनी ओंकार यांच्या सांगितीक प्रवासाच्या वाटचालीतील अनेक गंमती सांगितल्या तर प्रख्यात गायक अभिजित जाधव याने या अद्यावत म्युझिक स्कुल च्या उदघाटनाप्रति आनंद व्यक्त करीत शुभेच्छा दिल्या. आपल्या भाषणात मानवलोकचे कार्यवाह अनिकेत लोहिया यांनी ओंकार यांच्या सांगितीक शिक्षणाचे कौतुक करीत अंबाजोगाई शहरात बॉम म्युझिक स्कुल काढण्याचे जे धाडस केले त्या धाडसाचे कौतुक करीत या म्युझिक स्कुल च्या माध्यमातून ओंकार चे, अंबाजोगाई चे आणि संगीताचे नांव अधिक प्रकाशमय होवो या शुभेच्छा दिल्या.
बॉम म्युझिक स्कुल चे उद्घाटन ओंकार रापतवार यांच्या आई कल्पना रापतवार, आजी चंद्रकला रापतवार यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमात आपले मनोगत व्यक्त करतांना ओंकार रापतवार याने अंबाजोगाई शहर आणि परिसरातील मुलांना व संगीत प्रेमींना संगीत क्षेत्रातील पारंपारिक व अत्याधुनिक सर्व वाद्यांचे आणि गायनाचे अद्यावत शिक्षण देण्याचा प्रयत्न या बॉम म्युझिक स्कुल च्या माध्यमातून करण्यात येईल. हे शिक्षण घेण्यासाठी वयाची कसलिही अट राहणार नाही. संगीतातील सर्व प्रकारची वांद्रे आणि गायनाचे शिक्षण देणारी ही बीड जिल्ह्यातील एकमेव म्युझिक स्कुल असेल असे सांगत शहरातील जास्तीत जास्त पालकांनी आपल्या मुलांना अद्यावत शिक्षण देण्यासाठी प्रवेश निश्चित करावा असे आवाहन केले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक ज्येष्ठ पत्रकार सुदर्शन रापतवार यांनी केले तर आभार शिक्षक मैत्री प्रतिष्ठान चे अध्यक्ष विजय रापतवार यांनी मानले.


या कार्यक्रमाचे बहारदार संचालन प्रा. अनंत कांबळे यांनी केले तर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी भिमाशंकर शिंदे व ओंकार रापतवार मित्र मंडळाच्या वतीने करण्यात आले. या कार्यक्रमास शहरातील संगीत प्रेमी व विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.