महाराष्ट्र
बीड जिल्ह्यातील खटवळ लिमगाव येथे अंतराळातुन पडलेले ते दगड उल्कापिंड!

बीड जिल्ह्यातील खटवळ निमगाव येथे पडलेले ते दगड उल्कापिंड असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.
खटवळ लिमगाव येथे अंतराळातुन दोन दगड पडल्याची बातमी काही तासांतच जगभर पसरली. छत्रपती संभाजी नगर येथील एपीजे अब्दुल कलाम अंतराळ संशोधन केंद्र येथील तज्ञांनी या गावाला भेट देवून अभ्यासासाठी ही दोन ही दगडे छत्रपती संभाजी नगर येथील अंतराळ संशोधन केंद्रात नेली होती. या अभ्यासाकांनी दगडाची पाहणी केल्यानंतर 80 सेंटीमीटर आकाराचे हे दगड उल्कापिंड असल्याचं सांगितलं. हा सगळा आशनीपाताचा प्रकार असावा असं जाणवत असल्याचं खगोल अभ्यासक मयुरेश प्रभुणे यांनी सांगितलं.

या उल्कापिंडाला म्हणजे या दोन्ही दगडांना आता जिओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाचे शास्त्रज्ञ ताब्यात घेणार आहेत. या संदर्भात अधिक संशोधन केल्यानंतर याची उर्वरित माहिती समजणार आहे.

