महाराष्ट्र

“बीजेएस”च्या राज्य कार्यकारिणीत धनराज सोळंकी यांची निवड

शेती व्यवसायाशी निगडीत असलेले पारंपरिक वयापारी, सामाजिक कार्यकर्ते धनराज गौतमचंद सोळंकी यांची भारतीय जैन संघटनेच्याराज्य कार्यकारिणीवर नियुक्ती करण्यात आली आहे. 

धनराज सोळंकी हे गेली अनेक वर्षे भारतीय जैन संघटनेचे पदाधिकारी आहेत. व्यापार, सामाजिक कार्यासोबतच ते भारतीय जैन संघटनेशी गेली अनेक वर्षे निगडित आहेत. अंबाजोगाई तालुका अध्यक्ष पदापासून त्यांनी आपल्या कामाला सुरुवात केली. बीड जिल्हा अध्यक्ष, मराठवाडा विभाग अध्यक्ष अशी प्रमुख जबाबदारी त्यांनी स्विकारत त्यांनी राज्यकार्यकारीणीत प्रवेश मिळवला.

व्यवसाय, सामाजिक कार्य करीत त्यांनी मोठा मित्र परीवार आपल्या सोबत जोडला. स्वच्छ प्रतिमेचा व्यावसायिक, कार्यकर्ता म्हणून आपली ओळख निर्माण करण्यात धनराज सोळंकी यशस्वी झाले आहेत.

भारतीय जैन संघटनेच्या राज्य कार्यकारिणीमध्ये निवड झाल्याबद्दल त्यांचे अनेकांनी अभिनंदन केले आहे.

Sudarshan Rapatwar

महाराष्ट्रातील प्रगल्भ पत्रकार मराठवाड्यातील पत्रकारितेला एक नवा आयाम देण्याचा त्यांचा यशस्वी प्रयत्न असतो. गावातील पत्रकारिता जिल्ह्यात, राज्य आणि देश पातळीवर नेण्यात त्यांचे मोठे योगदान आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button