बाबासाहेब परांजपे दिंव्यांग विद्दालयाने १९ पारीतोषिके पटकावली


अंबाजोगाई – स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त जिल्हास्तरीय दिव्यांगाच्या क्रीडा स्पर्धा घेण्यात आल्या या क्रीडा स्पर्धेत कै.पु.बाबासाहेब परांजपे निवासी दिव्यांग विद्यालयाच्या विद्यालयातील विद्यार्थ्यांनी क्रीडा व समुह नृत्य स्पर्धेत घवघवीत यश संपादन करून या विद्यालयाने एकुण 19 पारितोषिके पटकाविली आहेत. या अपंग विद्यार्थ्यांचे जिल्ह्यातून कौतुक होत आहे.
वैष्णवी खांडेकर जिल्ह्यात प्रथम
देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव वर्ष साजरे होत असल्यामुळे जिल्हास्तरावर विविध अपंग विद्यार्थ्यांच्या स्पर्धा घेण्यात आल्या या क्रीडा स्पर्धेत कै.पु.बाबासाहेब परांजपे निवासी दिव्यांग विद्यालयाची 8 ते 13 वयोगटात 15 मीटर धावणे स्पर्धेत वैष्णवी खांडेकर हिने एक पाय व एक कुबडीच्या सह्याने जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकाविला. 13 ते 16 वयोगटातील 100 मीटर धावण्यात मुलांमध्ये आशिष भाबळे व मुलीमधून कोमल लाड यांनी प्रथम क्रमांक मिळविला. स्वॉफ्ट बॉल थ्रो मध्ये आरती उपाडे हि प्रथम आली. तर गोळाफेक मध्ये नुमान खुरेशी प्रथम आला. क गटातून दोन कुबड्याच्या सहाय्याने 13 ते 16 वयोगटातून 100 मीटर धावण्याच्या स्पर्धेत नम्रता मुळे प्रथम आली. तर ब गटातून 100 मीटर धावण्याच्या स्पर्धेत यश कापसे याने प्रथम क्रमांक पटकावला तर याच गटातून मुलीमध्ये साक्षी वाघमारे हिने 100 मीटर व 200 मीटर या दोन्ही क्रीडा प्रकारात प्रथम क्रमांक पटकाविला आहे.
समुह नृत्य सादर करुन जिंकली मने!
राजमाता प्रतिष्ठाणच्या समुह नृत्य स्पर्धेमध्ये सामान्य मुलांच्या बरोबरीने परांजपे निवासी विद्यालयाने प्रथम क्रमांक पटकाविला आहे. अस्थिव्यंग आठ व दिव्यांग एक विद्यार्थ्यांनी आपले समुह नृत्य सादर करून प्रेक्षकांची मने जिंकली. दिव्यांग व अपंग विद्यार्थ्यांनी सर्वसाधारण विद्यार्थ्यांच्या बरोबरीने आपण स्पर्धा जिंकू शकतो याचे उदाहरण त्यांनी दाखवून दिले. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे जिल्हा समाज कल्याण अधिकारी रविंद्र शिंदे, अंकुश नखाते, परांजपे विद्यालयाचे संभाजी लांडे, राजू वाघमारे व विद्यालयाच्या मुख्याध्यापिका ललिता चव्हाण, क्रीडा विभाग प्रमुख गोविंद जगधने यांनी अभिनंदन केले आहे.