बापाच्या माघारी कुटुंब एकत्र ठेवणं खुप कठीण काम; जयदत्त क्षीरसागर
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/08/image_editor_output_image1204795798-1693134193493-300x202.jpg)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/08/image_editor_output_image1204795798-1693134193493-300x202.jpg)
कोणत्याही कुटुंबात बाप जिवंत असेपर्यंत एकी असते मात्र बापाच्या माघारी कुटुंब एकत्र ठेवण कठीण काम आहे,रक्ताच्या नात्यापेक्षा तुमचं माझं नात अधिक घट्ट आहे अस म्हणत माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी तुम्हाला विश्वासात घेतल्याशिवाय कोणताही निर्णय घेणार नाही याचा पुनरुच्चार केला.
गजानन सहकारी सूत गिरणी येथे विविध संस्थांच्या सर्वसाधारण सभेत ते बोलत होते.क्षीरसागर यांच्या घरात मागील आठवड्यात पुतण्या डॉ योगेश क्षीरसागर यांनी बंड करत अजित पवार गटात प्रवेश केला.त्यानंतर जयदत्त क्षीरसागर काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष होते. सूतगिरणी येथे जमलेल्या हजारो निष्ठावन्त कार्यकर्ते ,सभासद यांच्या समोर बोलताना क्षीरसागर भावनिक झाले.
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/08/image_editor_output_image465561611-1693134181821.jpg)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/08/image_editor_output_image465561611-1693134181821.jpg)
आजच्या काळात कुटूंब एकत्र ठेवण खूप कठीण काम आहे.जगदीश काळे यांनी ते एकत्र ठेवलं आहे,शेतात चार पाच मजले बांधले आहेत मात्र कुटुंब अद्यापही एकत्र आहे.हे सगळ्यांनाच जमत अस नाही.बापाच्या माघारी कुटुंब एकत्र ठेवण कठीण आहे अस म्हणत क्षीरसागर यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली.
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/08/IMG_20230827_162655-300x166.jpg)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/08/IMG_20230827_162655-300x166.jpg)
बीड शहर आणि जिल्ह्याच्या विकासासाठी आपण सतत पाठपुरावा करत आहोत.सत्तेत नसताना सुद्धा साडेपाचशे कोटींची कामे बीड शहरात मंजूर केली.रस्ते,नाल्या,एस टी स्टॅन्ड,जिल्हा रुग्णालय अशी कामे खेचून आणली.संजय गांधी निराधार योजनेच्या माध्यमातून हजारो गोरगरिबांना न्याय देण्याचं काम केलं.
आज बीडमध्ये सत्तेतील मंत्रिमंडळ येत आहे.वृत्तपत्रातून वाचलं की बीडमध्ये बॅनर बाजी जोरात झाली आहे.नेतेमंडळी येणार म्हणल्यावर स्वागत करायला पाहिजे,पण बीड जिल्हा दुष्काळाच्या छायेत आहे अशावेळी सत्ताधारी मंडळींनी याकडे लक्ष द्यावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/08/image_editor_output_image-1375051827-1693134271020-300x115.jpg)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/08/image_editor_output_image-1375051827-1693134271020-300x115.jpg)
माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या या सभेकडे सर्वांचे लक्ष लागले होते.घरातील बंडखोरी बाबत ते काय भूमिका घेणार यावर सर्वांच्या नजरा होत्या.
दरम्यान भविष्यातील निर्णयाबाबत बोलताना माजीमंत्री क्षीरसागर यांनी मी तुम्हा सर्वांना विश्वासात घेतल्याशिवाय कोणताही निर्णय घेणार नाही अस सांगत माझ्या रक्ताच्या नात्यापेक्षा तुमच्याशी असलेलं माझं नात अधिक घट्ट आहे.तुमच्या अन माझ्या भविष्यासाठी थोडी वाट पहावी लागेल अस सांगत आपण जी भूमिका घेऊ ती तुम्हाला मान्य असेल का असा सवाल केला.जयदत्त क्षीरसागर यांच्या स्वागतासाठी इट येथील सूतगिरणी परिसरात हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते,सभासद उपस्थित होते.
जयदत्त क्षीरसागर यांच्या स्वागतासाठी इट येथील सूतगिरणी परिसरात हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते,सभासद उपस्थित होते.