बदलत जग… आता तुमच्या होणा-या बाळाचं रंगरुप ही तुम्हाला बदलता येईल


हे ऐकून तुम्हाला धक्का बसेल. एका सुविधेच्या माध्यमाने प्रेग्नन्ट न होता आई वडील होणं आता शक्य होणार आहे. त्याचबरोबर बाळाचा रंग, रूप, उंची या गोष्टीही ठरवता येतील.
विज्ञानाच्या क्षेत्रात रोज नवनवीन शोध लागत आहेत. हे नवीन शोध लोकांना खूप आश्चर्यचकित करतात. असाच एक खुलासा गर्भधारणा म्हणजेच प्रेग्नन्सीविषयी केला आहे, जो ऐकून तुम्हाला धक्का बसेल. एका सुविधेच्या माध्यमाने प्रेग्नन्ट न होता आई वडील होणं आता शक्य होणार आहे. त्याचबरोबर बाळाचा रंग, रूप, उंची या गोष्टीही ठरवता येतील.


ही जगातील पहिली ‘कृत्रिम गर्भ सुविधा’ म्हणजेच ‘आर्टिफिशियल वोम्ब फॅसिलिटी’ आहे. ही टेक्निक अॅक्टोलाइफ नावाच्या कंपनीने सुरु केली आहे. यानुसार, बाळाच्या केसांचा रंग, डोळ्यांचा रंग, उंची, बुद्धिमत्ता आणि त्वचेचा टोन यांसारखी कोणतीही वैशिष्ट्ये 300 हून अधिक जीन्सद्वारे अनुवांशिकरित्या संपादित केली जाऊ शकतात.
आर्टीफिशीयल वोम्ब फॅसिलिटी म्हणजे काय?


कृत्रिम गर्भाच्या साहाय्याने बाळ निर्माण करण्याच्या पद्धतीला आर्टिफिशियल वोम्ब फॅसिलिटी म्हणतात. आईच्या शरीरात असलेल्या खऱ्या गर्भाशयाप्रमाणे कृत्रिम गर्भाशयाची रचना करण्यात आली असून या गर्भाशयात जन्माला येणारे मूल खूप खास असेल. यामध्ये पालक आपल्या मुलांमध्ये सर्व चांगल्या क्वालिटी टाकू शकतील.
पालक त्यांच्या इच्छेनुसार रंग, चेहऱ्याची वैशिष्ट्ये, सवयी आणि जीन्सदेखील बदलू शकतात. या तंत्रज्ञानाच्या मदतीने पालक मुलांच्या डोळ्यांचा रंग, त्यांची उंची निवडू शकतात. या तंत्रज्ञानाच्या मदतीने मूल सुरक्षितपणे जन्माला येईल, असा दावा कंपनीने केला आहे, अॅक्टोलाइफच्या 75 लॅब असून प्रत्येकामध्ये उच्च उपकरणे आहेत. प्रत्येक लॅबमध्ये 400 ग्रोथ पॉड्स आहेत जिथे गर्भ चांगल्याप्रकडे वाढू शकेल.
अशा प्रकारे करते काम आर्टिफिशियल वोम्ब लॅब


या तंत्राच्या साहाय्याने एका यंत्रामध्ये पुरुष आणि एका महिलेचे शुक्राणू मिसळले जातात. त्यानंतर हे यंत्र मातेच्या गर्भाप्रमाणे काम करू लागते. पॉड्समध्ये एक आर्टिफिशियल अँब्लिकल कॉर्ड म्हणजेच कृत्रिम नाळ असेल, ज्याद्वारे बाळाला ऑक्सिजन आणि पोषक द्रव्ये मिळत राहतील.आईच्या गर्भाशयात जसा द्रव असतो ताशाचप्रकारे आर्टिफिशियल वोम्ब अमीनोओटिक्स टाकला जाईल. मूल विकसित होताना त्यानुसार पोषक तत्त्वे जोडली जातील. डॉक्टर म्हणतात, ज्याप्रकारे मूल 9 महिने आईच्या पोटात राहते. तसेच ते कृत्रिम गर्भाशयातच राहते. त्यामुळे आरोग्याला कोणताही धोका नसतो. मात्र ही टेक्निक अद्याप वापरलेली नाही. त्यामुळे डॉक्टरांचे म्हणणे आहे की याबद्दल अद्याप काहीही निश्चितपणे सांगता येत नाही.