“बखर कोरोना महामारीची”पुस्तकाचे आज ११ फेब्रुवारी रोजी प्रकाशन


नवी दिल्ली येथील सेंटर फॉर सायन्स अँड एनव्हारयमेंट येथे कार्यरत असलेल्या डॉ. सुनिता नारायण यांनी संपादित केलेल्या “द पॅडेमिक जर्नल” या इंग्रजी पुस्तकाचा अंबाजोगाई शहरातील तज्ञ अभ्यासक डॉक्टरांनी मराठीत अनुवाद केलेल्या “बखर कोरोना महामारीची” या पुस्तकाचे प्रकाशन आज योगेश्वरी शिक्षण संस्थेच्या नागापुरकर सभागृहात सायंकाळी ४:०० वाजता करण्यात आले असल्याची माहिती योगेश्वरी महाविद्यालयाचे सेवानिवृत्त प्राचार्य डॉ. आर. डी. जोशी यांनी दिली.
प्राचार्य डॉ. आर. डी. जोशी. यांची माहिती
या संदर्भात अधिक माहिती देताना योगेश्वरी महाविद्यालयाचे सेवानिवृत्त प्राचार्य डॉ. आर. डी. जोशी यांनी सांगितले की, “नवी दिल्ली येथील सेंटर फॉर सायन्स अँड एनव्हारयमेंट येथे कार्यरत असलेल्या डॉ. सुनिता नारायण यांनी संपादित केलेले “द पॅडेमिक जर्नल” हे इंग्रजी भाषेत लिहिलेले पुस्तक संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुरेश खुरसाळे यांच्या वाचनात आले. या पुस्तकात लिहिलेले तपशील सर्वसामान्य जनतेला सहज सोप्या मराठी भाषेत समजावेत म्हणून या पुस्तकाचे मराठी भाषेत संपादन करण्याची इच्छा डॉ. सुरेश खुरसाळे यांनी व्यक्त केली आणि यातुनच या पुस्तकाचा अनुवाद “बखर कोरोना महामारीची” या पुस्तकात झाला.
ज्येष्ठ सुक्ष्मजीवशास्त्र तज्ञ डॉ.रंजन गर्गे यांच्या हस्ते होणार प्रकाशन तर डॉ. खुरसाळे अध्यक्ष
“द पॅडेमिक जर्नल ” या इंग्रजी पुस्तकाचा मराठी अनुवाद करण्यासाठी डॉ. आर. डी. जोशी, डॉ. संतोष कुलकर्णी, डॉ. शुभदा लोहिया, डॉ. मुकुंद मोगरीकर, डॉ. एक. बी. नरसिंगे, डॉ. सुनील घाडगे या नामवंत अभ्यासकांनी आपले अभ्यासपुर्ण योगदान दिले असून या पुस्तकाचे प्रकाशन आज १२ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ४:०० वाजता ज्येष्ठ सुक्ष्मजीवशास्त्र तज्ञ तथा औरंगाबाद येथील शासकीय ज्ञान विज्ञान महाविद्यालयाचे सेवानिवृत्त प्राचार्य डॉ.रंजन गर्गे यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी योगेश्वरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुरेश खुरसाळे हे राहणार आहेत.
‘कोरोना: समज-गैरसमज’ या विषयावर परिसंवाद


या पुस्तक प्रकाशनाच्या निमित्ताने “कोरोना: समज-गैरसमज” या विषयावरील परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. या परीसंवादात स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयाच्या सुक्ष्म जीवशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. संदीप निळेकर, सहयोगी प्राध्यापक डॉ. अमित लोमटे आणि जन औषध वैद्यकशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. प्रशांत दहीरे यांचा सहभाग राहणार आहे.
यांनी केले उपस्थित राहण्याचे आवाहन
दोन वर्षांपूर्वी संपुर्ण जगाला हेलावून टाकणा-या आणि अतिशय महत्त्वाच्या विषयावरील आयोजित करण्यात आलेल्या या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमास शहरातील अभ्यासु आणि चिकित्सक प्राध्यापक,शिक्षक आणि नागरीकांनी उपस्थित रहावे असे आवाहन सर्व लेखकांच्या वतीने सेवानिवृत्त प्राचार्य डॉ. आर. डी. जोशी, डॉ. शुभदा लोहिया व योगेश्वरी शिक्षण संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.