“बकुळफुले” हे वाचकांच्या मनाचा ठाव घेणारे पुस्तक ठरेल
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2024/03/img-20240324-wa00197153003372643378166-1024x576.jpg)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2024/03/img-20240324-wa00197153003372643378166-1024x576.jpg)
ज्येष्ठ साहित्यिक अमर हबीब यांचे मत
“बकुळफुले” वाचकांच्या मनाचा ठाव घेणारं पुस्तक ठरेल असे मत ज्येष्ठ पत्रकार, साहित्यिक अमर हबीब यांनी व्यक्त केले.
येथील ज्येष्ठ नागरिक व उत्तम वाचक तुळशीदास पल्लेवार यांनी लिहिलेल्या “बकुळफुले” या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात अमर हबीब बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार सुदर्शन रापतवार होते.
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2024/03/img-20240324-wa00272351315682002656435-1024x576.jpg)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2024/03/img-20240324-wa00272351315682002656435-1024x576.jpg)
आपल्या विस्तारीत मनोगतात अमर हबीब पुढे म्हणाले की, “बकुळफुले” या पुस्तकात शब्दबद्ध करण्यात आलेली सर्व पात्रे ही लेखकाच्या नातेसंबंधातील असले तरी ते सर्व या अंबाजोगाई शहरातील प्रातिनिधिक पात्रे आहेत, त्यामुळे “बकुळफुले” हे ठराविक कुटुंबापुरते मर्यादित नाही तर ती सर्वांचेच प्रातिनिधिक स्वरूपातील आहेत असे मत व्यक्त केले.
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2024/03/img-20240324-wa00435877831136792535502-1024x576.jpg)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2024/03/img-20240324-wa00435877831136792535502-1024x576.jpg)
“बकुळफुले” लिहितांना लेखकाने आपले लिखाण कौशल्य पणाला लावले असून हळव्या आणि दुख-या घटनांची मांडणी अत्यंत कमी शब्दात मार्मिकपणे केली आहे. आपल्या कुटुंबातील आणि सहवासातील व्यक्ती बद्दल लिहितांना लेखकाने हातचे काही राखून ठेवले नाही किंवा उगीच पाल्हाळपणे ते पात्र रंगविण्याचा अथवा थांबवण्याचा ही प्रयत्न केला नाही. लालित्यपूर्ण भाषेत लिहिलेले “बकुळफुले” हे वाचकांच्या मनाचा ठाव घेणारे पुस्तक ठरेल असे मत त्यांनी व्यक्त केले.
प्रारंभी लेखक तुळशीदास पल्लेवार यांनी आपल्या मनोगतात “बकुळफुले” लिहिण्यामागील आपली प्रेरणा व कुटुंबातील सदस्यांनी केलेल्या सहकार्याबद्दलची माहिती दिली. मुर्त स्वरुपात असणाऱ्या या पुस्तकाला पुर्णत्वाच्या स्वरुपात आणण्यासाठी ज्यांनी ज्यांनी प्रयत्न केले त्या सर्वांचे त्यांनी आभार मानले.
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2024/03/img-20240324-wa00215819349225215181382-1024x576.jpg)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2024/03/img-20240324-wa00215819349225215181382-1024x576.jpg)
या कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप करताना ज्येष्ठ पत्रकार सुदर्शन रापतवार यांनी पुस्तक शब्दबध्द केलेल्या अनेक बकुळ फुलांच्या आठवणीं अधोरेखित केल्या. “बकुळफुले” ही केवळ स्मरणिका नाही तर ती या परिवाराची डॉक्युमेंटरी झाली आहे. परिवारातील ज्यि सदस्यांनी ही “बकुळ फुले” पाहिलेली आहेत, अनुभवलेली आहेत, एवढेच नव्हे तर या बकुळ फुलांच्या सुवास ही घेतला आहे त्यांना आणि ज्यांनी ही “बकुळफुले” पाहिलेली नाहीत त्यांच्या साठी ही डॉक्युमेंटरी निश्चित उपयोगी पडेल असे म्हटले आहे
साहित्य क्षेत्रात असा नवा अफलातून प्रयोग करणा-या लेखकास या बुकुळफुले च्या प्रकाशन निमित्ताने खुप खुप शुभेच्छा त्यांनी दिल्या.
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2024/03/img_20240324_1347141198323325107267429-1024x878.jpg)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2024/03/img_20240324_1347141198323325107267429-1024x878.jpg)
येथील हॉटेल साई पॅलेस घ्या फंक्शन हॉलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या या टुमदार कार्यक्रमाचे प्रास्ताविक ज्येष्ठ नागरिक महिला मंचच्या इंदु पल्लेवार यांनी केले. तर या कार्यक्रमात दिपक श्रीरामवार, सेवानिवृत्त गटशिक्षणाधिकारी काशिनाथ रापतवार, कमलाकर पल्लेवार, कल्पना पल्लेवार, खुषी पल्लेवार, राजेंद्र रापतवार, विवेक पल्लेवार, व इतरांनी आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पुनम पल्लेवार यांनी केले तर आभार पुजा पल्लेवार यांनी मानले.