महाराष्ट्र कृषि शिक्षण व संशोधन परिषदेचे शिक्षण संचालक प्रा. हेमंत पाटील यांच्या निधनाबद्दल कृषि महाविद्यालय, लातूर व विलासराव देशमुख कृषि जैवतंत्रज्ञान महाविद्यालय, लातूर येथील प्राध्यापक, अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थिनी-विद्यार्थी, मजूर यांनी तीव्र दुःख व्यक्त केले.
कृषी शिक्षण सुधारणांसाठी समर्पित योगदान देणारे व्यक्तिमत्त्व
एक ऋजू व्यक्तीमत्व, उत्कृष्ट संशोधक, उत्तम प्रशासक, दूरदृष्टी असलेले नेतृत्व, शासन व कृषि विद्यापीठामधील उत्तम समन्वयक, कृषि शिक्षण सुधारणांसाठी समर्पितपणे योगदान देणारे प्राध्यापक म्हणून हेमंत पाटील यांचे नाव कायम स्मरणात राहील असे मनोगत वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. इंद्र मणी यांनी व्यक्त केले.
तसेच, माजी संचालक शिक्षण डॉ. उदय खोडके म्हणाले कि विद्यापीठातील विलासराव देशमुख कृषि जैवतंत्रज्ञान महाविद्यालय, लातूर, पदव्युत्तर कृषि व्यवसाय व व्यवस्थापन महाविद्यालय, चाकूर, कृषि महाविद्यालय, गोळेगाव या तीन महाविद्यालयांची मंजुरी पासून जडणघडण पर्यंत त्यांनी महत्वाचे योगदान दिले.
कृषी विद्यापीठासाठी अमुल्य योगदान
याप्रसंगी महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. बाबासाहेब ठोंबरे म्हणाले कि हेमंत पाटील यांचे विद्यापीठाकरीताचे योगदान अमूल्य आहे व त्यांचा प्रगतीचा वारसा असाच पुढे चालू ठेवण्याची ग्वाही त्यांनी याप्रसंगी दिली. विद्यार्थिनी-विद्यार्थी आपले मनोगत व्यक्त करतेवेळी त्यांचे आधारस्तंभ व मार्गदर्शक गमावल्याची भावना व्यक्त करून आदरांजली वाहिली.
महाराष्ट्रातील सर्व कृषि विद्यापीठातील प्राध्यापक, अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थिनी-विद्यार्थी, मजूर यांनी दुखः व्यक्त केले. याप्रसंगी डॉ. दिनेशसिंह चौहान, डॉ. व्यंकट जगताप, डॉ. विजय भामरे, डॉ. सारिका भालेराव, डॉ. भास्कर आगलावे, डॉ. राहुल चव्हाण, डॉ. अजित पुरी व डॉ. योगेश भगत यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
महाराष्ट्रातील प्रगल्भ पत्रकार मराठवाड्यातील पत्रकारितेला एक नवा आयाम देण्याचा त्यांचा यशस्वी प्रयत्न असतो. गावातील पत्रकारिता जिल्ह्यात, राज्य आणि देश पातळीवर नेण्यात त्यांचे मोठे योगदान आहे.