प्रा. पंडीत कराड यांना पीतृशोक


काशिनाथराव कराड यांचे निधन
येथील योगेश्वरी महाविद्यालयाचे सेवानिवृत्त उपप्राचार्य प्रा. पंडीत कराड यांचे वडील काशिनाथ राव संभाजी कराड यांचे वृद्धापकाळाच्या आजाराने निधन झाले. वयाची १०० री त्यांनी नुकतीच पुर्ण केली होती.
काशिनाथराव कराड हे लातुर जिल्ह्यातील वांगदरी या गावचे मुळ रहिवासी होते. जुन्या पिढीतील कॉंग्रेस पक्षिचे एकनिष्ठ कार्यकर्ते अशी त्यांची ग्रामिण भागात ओळख होती. एक सच्चा प्रामाणिक कार्यकर्ता अशी ओळख असणारे काशिनाथराव हे वांगदरी भागातील एक प्रगतीशील आणि सधन शेतकरी ही होते. त्या काळातील अनेक मोठ्या राजकीय नेत्यांसोबत त्यांची उठबस असायची.
काशिनाथराव कराड यांनी वयाची नुकतीच १०० री ही पुर्ण केली होती. गेली वर्षभरापासून वृध्दापकाळात या आजाराने त्यांची प्रकृती खालावली असली तर अगदी अलिकडील कालावधीतही ते स्वतः ची सर्व कामे स्वतः च करीत असत. दोन दिवसांपूर्वीच त्यांची प्रकृती खालावली आणि आज दुपारी १:३५ वा. त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आज सायंकाळी ५:३० वाजता त्यांचे पार्थिवावर वांगदरी ता. रेणापूर जि. लातुर येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांचे पश्चात प्रा. पंडीत कराड, रंगनाथ कराड ही दोन मुले, सुना, सुशीला, सुमन, रंजना आणि कुशावर्ता या चार मुली, जावाई, नातवंडं-पतवंड आदी मोठा परीवार आहे.