प्रा. देविदास खोडेवाड यांच्या तीन ग्रंथांचे २१ सप्टेंबर ला प्रकाशन


डॉ. सुरेंद्र आलुरकर, सुदर्शन रापतवार व इतर मान्यवरांची प्रमुख उपस्थिती
अंबाजोगाई येथील खोलेश्वर महाविद्यालयातील मराठी विभाग प्रमुख प्रा. डॉ. देविदास खोडेवाड यांनी लिहिलेल्या तीन पुस्तकांचे २१ सप्टेंबर रोजी खोलेश्वर महाविद्यालयाच्या के. गोपीनाथ राव मुंडे सभागृहात करण्यात येणार आहे.
भारतीय शिक्षण प्रसारक मंडळाच्या खोलेश्वर महाविद्यालयातील मराठी विभाग प्रमुख प्रा. देविदास खोडेवाड यांनी अध्यापणा सोबतच स्वतः:चा लेखणाचा छंद त्यांनी जोपासला आहे. प्रा. देविदास खोडेवाड यांनी लिहिलेल्या “पागोटे”, कोम्बिंग, आणि “प्रसार माध्यमांसाठी लेखन कौशल्य आणि कार्यालयीन मराठी भाषा” या तीन ग्रंथांचे लेखण केले आहे.


या तीनही ग्रंथा़चा प्रकाशन सोहळा २१ सप्टेंबर रोजी सकाळी १९ वाजता के. गोपीनाथ मुंडे सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाशिपचे अध्यक्ष डॉ. सुरेंद्रजी आलुरकर तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून ज्येष्ठ साहित्यिक व समीक्षक डॉ. साहेब खंदारे आणि कवी दिनकर जोशी हे राहणार आहेत.


या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून भा. शि प्र. संस्थेचे कार्यवाह डॉ . हेम़त वैद्द, प्रशासकीय अधिकारी प्रा. चंद्रकांत मुळे, स्थानिक समन्वय समितीचे अध्यक्ष विजय वालवडकर, श्री.किरण कोदकर, स्थानिक समन्वय समितीचे कार्यवाह किरण कोदरकर, महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष किरण कोदरकर, माध्यम न्यूज नेटवर्क चे संपादक तथा ज्येष्ठ पत्रकार सुदर्शन रापतवार, म.सा.प. शाखा, अंबाजोगाईचे सचीव कवि गोरख शेंद्रे गुरुजी हे राहणार आहेत.


या कार्यक्रमास रसिक श्रोत्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन प्राचार्य डॉ.मुकुंद देवर्षी, डॉ. बिभीषण फड, डॉ.सुभाष पटेकर, डॉ. दिगंबर मुळेगावकर, यांनी केले आहे.