प्रा.डॉ. संपदा कुलकर्णी यांची रंगभुमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळावर निवड


येथील स्वामी रामानंद तीर्थ कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या नाट्यशास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ. संपदा कुलकर्णी यांची महाराष्ट्र शासनाच्या रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळावर सदस्य म्हणून सलग तिसऱ्यांदा नियुक्ती झाली आहे.
नाट्य क्षेत्रातील कामाची घेतली दखल
प्रा. डॉ. संपदा कुलकर्णी या स्वामी रामानंद तीर्थ महाविद्यालयात नाट्यशास्त्र विभाग प्रमुख पदांची जबाबदारी सांभाळत असतांनाच शहरातील नाट्य चळवळ जीवंत आणि कायम चर्चेत ठेवण्यामध्ये त्यांचा मोठा वाटा आहे. गेली अनेक वर्षांपासून नाट्य क्षेत्रातील त्यांचे कार्य लक्षात घेता महाराष्ट्र शासनाने रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण (सेंसार) मंडळावर सलग तिसऱ्यांदा सदस्य म्हणून नियुक्ती केली आहे. तसा शासन निर्णय नुकताच निर्गमित करण्यात आलेला असून शासन स्तरावर नाट्य विषयक कार्य करण्यासाठी ही परिनिरीक्षण मंडळ अर्थात सेन्सॉर फार महत्त्वाचे कार्य करत असते.
सलग तिसऱ्या वेळेस झाली निवड!
या मंडळावर सदस्य म्हणून प्रा. डॉ.संपदा कुलकर्णी यांची ही सलग तिसऱ्यांदा नियुक्ती आहे. मराठवाड्यातील पहिलीच महिला सदस्या म्हणूनही त्यांचा सर्वत्र गौरव केला जात आहे.
डॉ. संपदा कुलकर्णी या गेल्या पंचवीस वर्षापासून मराठी रंगभूमीशी निगडित आहेत. सदरील निवडीबद्दल प्रा.डॉ. संपदा कुलकर्णी यांचे अनेकांनी अभिनंदन केले आहे.