प्रजासत्ताक दिनी दगडवाडी येथे सार्वजनिक ग्रंथालयाची सुरुवात
ग्रामऊर्जा फाउंडेशन च्या माध्यमातुन जिल्हा परिषद शाळा गजानन वस्ती व जिल्हा परिषद शाळा दगडवाडी अंबाजोगाई या शाळेंना 250 पुतकांची ग्रंथालय किट व भाषा किट देण्यात आली आहे, या कार्यक्रमाला उपस्थित विद्यार्थी, शिक्षक, सरपंच, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, ग्रामऊर्जा संस्थेचे प्रतिनिधी व गावकरी उपस्थित होते.
या किट मध्ये लेवल एक ते 4 पर्यंत ची गोष्टींची, चित्रांची, गाण्यांची, तसेच प्राणी, पक्षी, झाडे यांच्या माहितीची पुस्तके आहेत, वाचता न येणाऱ्या पासुन ते वाचता येणाऱ्या सर्व मुलांन साठी या किट मध्ये पुस्तके आहेत, तसेच या पुस्तकामुळे मुलांन मध्ये वाचनाची गोडी आणि पुस्तकांशी मैत्री निर्माण होयला मदत होइल.
फिरती वाचनाची किट असल्यामुळे शिक्षकांना मुलांना घेऊन झाडाखाली बसता येईल, मोकळ्या मैदानात बसता येईल वर्गात बसता येईल ग्रामऊर्जा फाउंडेशन च्या माध्यमातुन आतापर्यंत 15 जिल्हा परिषद शाळेमध्ये वाचनायल सुरु करण्यात आली आहेत.