प्रजासत्ताक दिनाच्या सायंकाळी बॉम म्युझिक स्कुल मध्ये गुंजणार राष्ट्रभक्तीपर गीतांचे सुर!
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/01/IMG_20230125_122509-757x1024.jpg)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/01/IMG_20230125_122509-757x1024.jpg)
भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या ७३ व्या वर्धापन दिनानिमित्त येथील बॉम म्युझिक स्कुल मध्ये सायंकाळी ५ वाजता राष्ट्रभक्तीपर गीतांचा सांगीतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमात माजी सैनिकांच्या सत्काराचेही आयोजन करण्यात आले आहे.
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/01/IMG_20230125_122451-275x300.jpg)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/01/IMG_20230125_122451-275x300.jpg)
अंबाजोगाई शहरातील मुलांना व संगीतप्रेमींना संगीताचे अत्याधुनिक शिक्षण मिळावे म्हणून तरुण संगीतकार ओंकार रापतवार याने अद्यावत अशा बॉम म्युझिक स्कुल ची निर्मिती कांहीं महिन्यांपुर्वी केली. या म्युझिक स्कुल ला अत्यंत चांगला प्रतिसाद मिळत असून भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या ७३ व्या वर्धापन दिनानिमित्त म्युझिक स्कुल मधील संगीत शिक्षक. रियाझ , ऋचा कुलकर्णी आणि ओंकार रापतवार यांच्या सांगितीक मैफलीचे आयोजन करण्यात आले आहे.
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/01/IMG-20230125-WA0170-300x213.jpg)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/01/IMG-20230125-WA0170-300x213.jpg)
या मैफलीत ऋचा कुलकर्णी हरीचे सुश्राव्य गायन, रियाझ सर यांचे सुरेल गिटार वादन आणि संगीतकार ओंकार रापतवार यांचे विविध सांगितीक वाद्दावरील वादनाच्या सुरेल कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
माजी सैनिकांचाही होणार सन्मान!
या कार्यक्रमात माजी सैनिकांचा प्रातिनिधिक स्वरूपात सत्कार करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी, ज्येष्ठ पखवाज वादक पं. उध्दवबापु आपेगावकर, ज्येष्ठ संगीतशिक्षक प्रकाश बोरगावकर यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.या कार्यक्रमात संगीतप्रेमी लोकांनी उपस्थित राहावे असे आवाहन बॉम म्युझिक स्कुल चे संचालक ओंकार रापतवार यांनी केले आहे.