ठळक बातम्या
पोलीस शिपाई आशा चौरे आणि सचीन अहंकारे यांना पदोन्नती


आयपीएस पंकज कुमावत यांनी दिल्या शुभेच्छा!
पोलीस उपविभागीय अधिकारी कार्यालयात कार्यरत असलेले पोलीस नाईक सचिन अहंकारे आणि महिला पोलीस नाईक आशा चौरे यांना पोलीस जमादारपदी बढती मिळाली. या बद्दल सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांनी फीत लावून त्यांचे अभिनंदन केले.


सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या पथकातील पोलीस नाईक सचिन अहंकारे आणि महिला पोलीस नाईक आशा चौरे यांना त्यांच्या सेवा जेष्ठते नुसार पोलीस जमादारपदी बढती मिळाली आहे.. त्या निमित्त आज सोमवारी (दि. ६) त्यांना सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या हस्ते फीत लावण्यात आली. या वेळी सिमाली कोळी, कुलकर्णी, मुकुंद ढाकणे, घुले, बालाजी दराडे, बाबासाहेब बांगर, अनिल मंदे, राजू वंजारे, विकास चोपणे, शिवाजी कागदे, महादेव सातपुते, रामहरी भंडाने, संजय टुले यांच्यासह पत्रकार गौतम बचुटे उपस्थित होते.