महाराष्ट्र
पृथ्वीराज साठे यांच्या विजयासाठी संकेत मोदी यांची शहरात पदयात्रा

अंबाजोगाई शहर हे राजकिशोर मोदी व मोदी कुटुंबाला मानणारे शहर आहे. त्यांच्या आशिर्वादानेच राजकिशोर मोदी हे मागील अनेक वर्षांपासून अंबाजोगाई नगर परिषदेच्या माध्यमातून शहरवासीयांची सेवा करत आहेत.आपल्या पित्याचा समाजसेवेचा वसा राजकिशोर मोदी यांचे सुपुत्र संकेत राजकिशोर मोदी हे पुढे चालवताना आढळून येत आहेत. ते सामाजिक शैक्षणिक तसेच सांस्कृतिक घडामोडीत हिरीरीने सहभाग घेऊन शहराची संस्कृती पुढे नेत आहेत. सामाजिक क्षेत्राबरोबरच राजकिय क्षेत्रात देखील ते हळूहळू सक्रिय होऊ पहात आहेत.

सध्या राज्यात विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी अंतिम टप्प्यात येत आहे. अंबाजोगाई केज विधानसभा मतदार संघात देखील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार पृथ्वीराज साठे यांचा प्रचार देखील जोर धरू लागला आहे. साठे यांच्या प्रचारासाठी संकेत राजकिशोर मोदी यांनी आपल्या अनेक सहकाऱ्यांसह संपूर्ण अंबाजोगाई शहर हे अक्षरशः पिंजून काढले आहे.अंबाजोगाई शहरातील प्रभाग क्रमांक १ पासून ते प्रभाग क्रमांक १४ मधील सर्व भागात जाऊन तेथील प्रत्येक नागरिकांच्या प्रत्यक्ष भेटी घेण्याचा प्रयत्न केला व त्यामध्ये त्यांना मोठया प्रमाणावर यश देखील प्राप्त झाले.
