पृथ्वीराज साठे यांच्या विजयासाठी राजकिशोर मोदी समर्थकांसह प्रचारात
केज विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार पृथ्वीराज शिवाजीराव साठे यांच्या प्रचारार्थ राजकिशोर मोदी आज आपल्या समर्थकांसह अंबाजोगाई शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक, बलुतेचा मळा, कुत्तर विहीर, भट गल्ली, जैन गल्ली, कोठाळ गल्ली, झारे गल्ली,धनगर गल्ली, बाराभाई गल्ली, दमगानपुरा, मनियार गल्ली,भोई गल्ली, बागबान गल्ली, सातपुते गल्ली, मंडी बाजार परिसरात प्रचार फेरी काढून पृथ्वीराज साठे यांना विजयी करण्याचे आवाहन केले.
आपल्या अंबाजोगाई शहराच्या व केज विधानसभा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी येत्या २० नोव्हेंबर रोजी ‘तुतारी वाजवणारा माणूस’ या चिन्हासमोरील बटण दाबून श्री.पृथ्वीराज साठे यांना सेवा करण्याची संधी द्यावी.
आताच्या विद्यमान आमदार हे जनतेच्या हक्काच्या मागण्यांना दाद न देता गुत्तेदारांना पोसण्याचे काम करीत आहेत व त्या माध्यमातून सत्तेची पोळी भाजू पाहणाऱ्यांना या निवडणुकीत बाहेरचा रस्ता दाखवावा, असे आवाहन या वेळी राजकिशोर मोदी यांनी केले.