पु. नारायणदादा काळदाते स्मृती प्रतिष्ठान चे पुरस्कार जाहीर
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/08/IMG-20230825-WA0338-300x184.jpg)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/08/IMG-20230825-WA0338-300x184.jpg)
राजेश टोपे, संपतराव पवार पुरस्काराचे मानकरी
पु. नारायणदादा काळदाते स्मृती प्रतिष्ठान च्या वतीने देण्यात येणारा पु. नारायणदादा काळदाते स्मृती पुरस्कार माजी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना तर ‘डॉ.द्वारकादासजी लोहिया लोकसहभाग पुरस्कार 2023’ सामाजिक कार्यकर्ते संपतराव पवार यांना जाहिर झाला आहे.
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/08/IMG-20230825-WA0335-300x300.jpg)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/08/IMG-20230825-WA0335-300x300.jpg)
खा.सुप्रिया सुळे यांच्या शुभहस्ते व व्हि.प्रकाशराव यांच्या शुभहस्ते ७ सप्टेंबर रोजी हे पुरस्कार प्रदान होणार आहेत.
पु.नाराणदादा काळदाते स्मृती प्रतिष्ठान, अंबाजोगाईच्या वतीने शैक्षणिक अथवा सामाजिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या एका व्यक्तीस अथवा संस्थेस अथवा समाजोपयोगी उपक्रमास पु.नारायणदादा काळदाते स्मृती सन्मती पुरस्काराने गौरविले जाते. या वर्षीचा तेरावा पुरस्कार माजी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना देण्यात येणार आहे. हा पुरस्कार संसदरत्न खा. सुप्रिया सुळे यांच्या शुभहस्ते देण्यात येणार आहे.
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/08/IMG-20230825-WA0331-300x169.jpg)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/08/IMG-20230825-WA0331-300x169.jpg)
तसेच मानवलोक व नारायणदादा काळदाते स्मृती प्रतिष्ठान च्या वतीने या वर्षी पासून पाणी व दुष्काळ निवारणासाठी कार्य करणाऱ्या व्यक्ती किंवा संस्थेला ‘डॉ.द्वारकादासजी लोहिया लोकसहभाग पुरस्कार ‘ देण्यात येणार आहे. हा पहिला पुरस्कार सामाजिक कार्यकर्ते संपतराव पवार यांना देण्यात येणार आहे. हा पुरस्कार तेलंगणा जलसंपदा मंडळाचे अध्यक्ष व्हि प्रकाश राव यांच्या शुभहस्ते देण्यात येणार आहे.
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/08/image_editor_output_image1107329095-1692962622423-300x224.jpg)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/08/image_editor_output_image1107329095-1692962622423-300x224.jpg)
या पुरस्काराचे वितरण गुरुवार 07 सप्टेंबर 2023 रोजी सायंकाळी 4:00 वा. आद्यकवी मुकुंदराज सांस्कृतिक सभागृह, अंबाजोगाई येथे प्रदान करण्यात येणार आहे. 07 सप्टेंबर रोजी डॉ. द्वारकादास लोहिया यांची जयंती तर स्व. नारायणदादा काळदाते यांचा स्मृतीदिन आहे.
माजी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी आरोग्य क्षेत्रासह, उच्च शिक्षण, सहकार , सामाजिक क्षेत्रात तसेच कोवीड काळातील उत्कृष्ट कार्या बद्दल त्यांना पु.नारायणदादा काळदाते सन्मती पुरस्कार-2023 ने गौरविण्यात येणार येणार आहे. तर डॉ. द्वारकादासजी लोहिया लोकसहभाग पुरस्कार 2023 ने सामाजिक कार्यकर्ते संपतराव पवार यांना गौरविण्यात येणार आहे.
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/08/IMG-20230825-WA0336.jpg)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/08/IMG-20230825-WA0336.jpg)
हा पुरस्कार ‘पाणी व दुष्काळ निवारणासाठी’ च्या कार्यासाठी देण्यात येईल. कृषी पाणलोट चळवळीतील तज्ञ विजय बोराडे यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार सोहळा अंबाजोगाई येथे पार पडणार आहे.
चार दशकाहुन अधिक काळ पाणी व्यवस्थापनाच्या क्षेत्रात संपतराव पवार कार्यरत आहेत. बळीराजा स्मृती धरण, अग्रणी नदी पुनरूज्जीवन, तीळगंगा नदी वरील टायर बंधारा, हिवतड मध्ये कमी पाण्यात डाळींब प्रकल्प, दुष्काळ निवारणासाठी लोकसहभागातुन केलेला चारा प्रकल्प हे त्यांचे कार्य लोकाभीमुख ठरले आहे. या सर्व बाबींचा विचार करून त्यांना डॉ.द्वारकादासजी लोहिया लोकसह भाग पुरस्कार देऊन सन्मानीत करण्यात येणार असल्याची माहिती मानवलोक चे कार्यवाहक अनिकेत लोहिया यांनी दिली.
तरी या कार्यक्रमास आपण उपस्थित रहावे असे अवाहन पु.नारायणदादा काळदाते स्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष जी.जी.रांदड, मानवलोक संस्थेचे अध्यक्ष आशोकराव देशमुख, कार्यवाह अनिकेत लोहिया, उपाध्यक्ष प्रा. एस.के.जोगदंड व सचिव डॉ.नरेंद्र काळे, सहसचिव डॉ.नवनाथ घुगे, श्री.बनेश्वर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष भागवत गोरे, प्रताप पवार, विश्वास नरवाडे, अंगद तट, ॲड.चव्हाण जयसिंग, एस.बी.सय्यद, रजनी अंकुशराव काळदाते यासह सर्व सदस्यांनी केले आहे.