पुरुषोत्तम पुरी येथे भाविक गोदावरी नदीच्या पात्रात बुडाला; शोध कार्य सुरु


जगातील एकमेव असलेल्या बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यातील पुरुषोत्तमपुरी येथे दर्शनासाठी आलेला एक भाविक गोदावरी नदीत स्नान करण्यासाठी गेला असता तो नदीपात्रात बुडाला असल्याची धक्कादायक माहिती हाती आली आहे, सदरील सिंहाचे शोधकार्य सुरू आहे.


संपुर्ण जगात एकमेव असलेल्या बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यातील श्रीक्षेत्र पुरुषोत्तमपुरी येथील पुरुषोत्तम भगवानाच्या दर्शनास अधिक मासात अधिक महत्त्व आहे. या निमित्ताने पुरुषोत्तम पुरी येथील भगवान पुरुषोत्तमाच्या दर्शनासाठी जगभरातील भाविकांनी गर्दी केली आहे. देशातील एकमेव पुरुषोत्तमाचे मंदिर असणाऱ्या श्रीक्षेत्र पुरुषोत्तमपुरी येथे भगवान पुरुषोत्तमाचे दर्शन घेण्यासाठी आलेला एक भाविक गोदावरी नदीच्या पात्रामध्ये स्नान करण्यासाठी आज ११ऑगस्ट रोजी शुक्रवारी सकाळी गेला होता.


मिळालेल्या माहितीनुसार, जालना जिल्ह्यातील परतुर तालुक्यातील पाटोदा येथील रहिवासी मारुती खवल (वय वर्षं 48) हे आपल्या कुटुंबियांसह भगवान पुरुषोत्तमाच्या दर्शनासाठा आले होते. शुक्रवारी सकाळी नऊच्या सुमारास खवल कुटुंबीय गोदावरी नदीच्या पाण्यात स्नान करण्यासाठी होडीत बसले. मात्र मारुती यांनी आपणास पोहोता येते असे म्हटले आणि कपडे काढून ते स्नान करण्यासाठी नदी पात्रात उतरले.


थोडे अंतर पोहून गेल्यानंतर त्यांना दम लागला आणि पाण्याबाहेर येत असताना ते अचानक बेपत्ता झाले. त्यांचा शोध सुरू आहे.
या घटनेची माहिती मिळताच तहसीलदार वर्षा मनाळे, उपविभागीय पोलीस अधिकारी श्वेता खाडे, पोलीस उपनिरीक्षक योगेश खटकळ यांनी घटनास्थळी धाव घेतली. गावकरी आणि प्रशासन भाविकाचा शोध घेत आहे. सदरील बातमी लिही पर्यंत मारोती खवल यांचा शोध लागल्याची माहिती हाती आली नाही.