पीआय मोरे निलंबित तर डीवायएसपी जायभाये यांची बदली आ. नमिता मुंदडा यांच्या लक्षवेधी वर गृहमंत्र्यांनी केली कार्यवाही
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2022/08/IMG_20220818_115557.jpg)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2022/08/IMG_20220818_115557.jpg)
अवैध धंद्यांना कायदेशीर पोलीस संरक्षण देत हप्ते वसुली करणाऱ्या अंबाजोगाई येथील डीवायएसपी जायभाये यांची तातडीने बदली करत अंबाजोगाई ग्रामीणचे पोलीस निरीक्षक वासुदेव मोरे यांना निलंबित करण्याची घोषणा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात केली. केज च्या आ नमिता मुंदडा यांनी याबाबत प्रश्न उपस्थित केला होता.
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2022/08/IMG_20220818_120446.jpg)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2022/08/IMG_20220818_120446.jpg)
जिल्ह्यातील धोक्यात आलेली कायदा आणि सुव्यवस्था तसेच फोफावलेले अवैध धंदे या प्रश्नावर यापूर्वीच्या विधानसभा अधिवेशनात बरीच चर्चा झाली होती, त्यावरून तत्कालीन जिल्हा पोलीस अधीक्षक आर रामस्वामी यांची तडकाफडकी बदली देखील झाली होती.
बीड जिल्ह्यातील आंबेजोगाई पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अवैध व्यवसायांना प्रोत्साहन देणे, त्यांना पाठीशी घालणे या प्रकरणी झालेल्या चौकशीत संबधित पोलीस निरीक्षक दोषी आढळल्याने त्यांना निलंबित करण्याची तसेच संबंधी उपविभागीय पोलिस अधिकारी यांचीही अन्यत्र बदली करण्याची घोषणा उपुख्यमंत्रि तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2022/08/IMG_20220818_120029.jpg)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2022/08/IMG_20220818_120029.jpg)
नमिता मुंदडा यांनी उपस्थित केलेल्या याबाबतच्या लक्षवेधी सूचनेवर संबधित पोलीस निरीक्षक वासुदेव मोरे यांना निलंबित करण्यात आले.