परळी-लातुर रोड रेल्वे मार्गाच्या विद्युतीकरणाचे काम पुर्ण!
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/01/IMG_20230128_220805-300x224.jpg)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/01/IMG_20230128_220805-300x224.jpg)
दक्षिण मध्य रेल्वेच्या परळी ते पोखर्णी नृसिंह आणि परळी ते लातूररोड मार्गाचे विद्युतीकरण काम पूर्ण झाले आहे. दरम्यान, आज सायंकाळी विद्युतीकरणाची अंतर्गत तपासणी करून परळी ते लातूररोड मार्गावर इलेक्ट्रिक इंजिनची चाचणी घेण्यात आली.
परळी ते पोखर्णी नृसिंह आणि परळी ते लातूररोड दरम्यानच्या रेल्वे मार्गासाठी २५ केव्हीचे सबस्टेशन
वीजपुरवठा करण्यासाठी सज्ज आहे. विजेवरील इंजिनाची अंतर्गत चाचणी पूर्ण झाल्यानंतर संपूर्ण प्रवासी रेल्वेची चाचणी घेतली जाईल. पहिल्या टप्प्यात परळी ते पोखर्णी नृसिंह आणि परळी ते लातूररोड मार्गाचे विद्युतीकरण पूर्ण झालेल्या मार्गाची चाचणी आज करण्यात आली.
प्रथमच येणार वीजेचे इंजिन !
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/01/whatsapp-image-2023-01-28-at-8.26.53-pm_202301953515-1024x768.jpeg)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/01/whatsapp-image-2023-01-28-at-8.26.53-pm_202301953515-1024x768.jpeg)
प्रथम विजेचा पुरवठा केल्यानंतर पथकाकडून तपासणी केली जाईल. वीजपुरवठा व्यवस्थित सुरू आहे की नाही याची तपासणी केली जाते. अनावश्यक ठिकाणी विजेचा पुरवठा होत नाही ना, याची चाचपणी केली जाते. त्यानंतर विजेचे इंजिन चालवले जाईल. विजेच्या तारा तांब्याच्या असल्य चोरी होण्याची शक्यता लक्षात घेता चोवीस तास वीजपुर सुरू ठेवला जातो.
वरीष्ठांच्या उपस्थितीत इंजिनाची चाचणी
डिझेल इंजिन व विद्युत इंजिनाची प्रत्यक्ष चाचणी व तपा करण्यात आली. यावेळी दक्षिण मध्य रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी तांत्रिक विभागाचे अधिकारी विद्युत विभागाचे अधिकारी कंट्रोल रूम सबस्टेशनचे अधिकारी आदी उपस्थित होते.
नवीन गाड्या सुरू होण्यास मदत
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/01/IMG_20230128_220739-1024x631.jpg)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/01/IMG_20230128_220739-1024x631.jpg)
परळी,शनिवारी दक्षिण मध्य रेल्वेचे प्रधान मुख्य विद्युत अभियंता पीडी मिश्रा यांनी लातूर रोड -परळी नवीन विद्युतीकरण विभागाची पाहणी केली .हा प्रकल्प रेल्वे विद्युतीकरण सिकंदराबाद प्रकल्प ,रेल्वे केंद्रीय विद्युत वितरण संस्थेच्या युनिट द्वारे केले जात आहे .विकाराबाद ते लातूर रोड हा भाग टप्प्याटप्प्याने पूर्ण करण्यात आला आहे तर लातूर रोड ते परळी हा 63 किलोमीटर मार्गाचा विभाग सुरू झाल्याने विकाराबाद -परळी 263 किलोमीटर मार्गाचा संपूर्ण भाग विद्युतीकरण झाला आहे ,सिकंदराबाद- परळी हा संपूर्ण ब्रॉडगेज शंभर टक्के विद्युतीकृत झालाआहे यामुळे अतिरिक्त गाड्या सुरू करण्यास मदत होणार आहे