परळी-बीड-नगर रेल्वेमार्गातील अडथळे दुर करण्यासाठी स्वातंत्र्य सैनिक समितीचा पुढाकार


अहमदनगर बीड परळी रेल्वे मार्गातील अडथळे दूर करून या कमला गती यावी यासाठी स्वातंत्र्य सैनिक रेल्वे मागणी समितीच्या वतीने जिल्हाधिकारी शर्मा व पोलीस अधीक्षक ठाकूर यांची भेट घेऊन मागण्याचे निवेदन देणार आज समितीची आज सोमवारी निमंत्रक नामदेवराव क्षीरसागर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला .
निमंत्रक नामदेवराव क्षीरसागर यांचा पुढाकार


समितीने गेली ३५ वर्ष या रेल्वे मार्गाच्या कामासाठी सातत्याने पाठपुरावा केले आहे नगर ते आष्टी रेल्वे मार्गाचे काम पूर्ण झाले असून आष्टी ते अमळनेर मार्गाचे काम चालू आहे पण यात अनेक अडचणी आहेत भूसंपादन स्थानिक लोकांचा शेतकऱ्याचा याच त्रुटीमुळे होणार विरोध पाहता प्रशासन स्थरावर या अडचणी दूर केल्या तर अमळनेर पर्यंतचे रेल्वे काम या दोन महिन्यात पूर्ण होण्याची अपेक्षा आष्टी ते अमळनेर भागातील हॊतॊला बावी या ठिकाणच्या शेतकऱ्याच्या अडचणी असल्याने ते या कामाला विरोध करत आहेत रेल्वे प्रशासनाला आवश्यक असलेली काही जमीन जिल्हा प्रशासनाने दिली नाही.
६१ किमी च्या लोहमार्गासाठी लागली १३ वर्षे


केवळ ६१ कि मी च्या कामासाठी १३ वर्ष लागली बीड परळी मार्गाच्या कामास गती देण्यासाठी येथील भूसंपादनाचा प्रश्न निकाली काढून रेल्वेला आवश्यक ती जमीन त्याच्या ताब्यात द्यावी त्यासोबतच मागील महिन्यात रेल्वेचे कंत्राटदार आणि तेथील कामगारावर झालेला हल्ला पहाता पोलीस स्वरक्षणात हे काम केले जावे आदी मागणी निवेदनाद्वारे करण्यात येणार आहे.
मान्यवरांचा पुढाकार!


आज समितीचे निमंत्रक नामदेवराव क्षीरसागर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीस सत्यनारायण लाहोटी,एड गोविंद कासट,सय्यद नवीदुजमा,अरुण नाना डाके, जवाहरलाल सारडा,विष्णुदास बियाणी,शिवाजी जाधव,महंमद लाईक अहमद,शिवनारायण टवानी,वाय जनार्धनराव,साईनाथ परभने,मंगेश लोळगे आदी उपस्थित होते