राष्ट्रीय

परळीच्या मातीतील अस्सल टॅलेंट…!

माझ्यासोबत या फोटोमध्ये जी मुलगी दिसते ती कोणी सामान्य मुलगी नाही, तर ती मुलगी आहे राजस्थान मध्ये एक दिवस मुख्यमंत्री म्हणून काम केलेली केवळ 21 वर्षाची आमच्या परळीची कन्या मंजुश्री घोणे….होय हे खरे आहे. मी नायक चित्रपटाची स्टोरी सांगत नाही, तर प्रत्यक्ष या मुलीला भेटून एक सामान्य मुलगी ते राजस्थानची एक दिवसाची मुख्यमंत्री, जिने एका दिवसात राजस्थानमध्ये च्या सरकारमध्ये दोन मोठे निर्णय घेतले आणि त्या दोन्ही निर्णयाची राजस्थान सरकारने अंमलबजावणी केली. इतकंच नाही तर भविष्यात ते पाहून अनेक राज्यांनी त्या निर्णयाची कॉपी केली ती हीच एक दिवसाची मुख्यमंत्री म्हणजे मंजुश्री घोणे!

होय हे खरे आहे. मी नायक चित्रपटाची स्टोरी सांगत नाही, तर प्रत्यक्ष या मुलीला भेटून एक सामान्य मुलगी ते राजस्थानची एक दिवसाची मुख्यमंत्री, जिने एका दिवसात राजस्थानमध्ये च्या सरकारमध्ये दोन मोठे निर्णय घेतले आणि त्या दोन्ही निर्णयाची राजस्थान सरकारने अंमलबजावणी केली. इतकंच नाही तर भविष्यात ते पाहून अनेक राज्यांनी त्या निर्णयाची कॉपी केली ती हीच एक दिवसाची मुख्यमंत्री म्हणजे मंजुश्री घोणे!

परळीत सुरेश घोणे नावाचा माझा एक जुना मित्र…. कामाच्या व्यापात कधी त्याची भेटही व्हायची नाही किंवा कधी बोलणेही व्हायचे नाही, रस्त्यात कधी भेट झाली तर नमस्कार व्हायचा इतकेच काय ते.

बारावीपर्यंत मराठी माध्यमातून शिक्षण झाल्यानंतर तिने लातूरच्या दयानंद महाविद्यालयातून पदवीचे शिक्षण घेतले आणि भविष्यात आपल्याला डिफेन्स सेवेत जायचे म्हणून सुरू झाला तिचा शोधाचा अभ्यास! एका सोनाराच्या दुकानावर कारागीर म्हणून काम करता करता एसटी महामंडळात वाहक म्हणून नोकरी करत करत अतिशय सामान्य जीवन व्यतीत करणाऱ्या सुरेश आजही तीन खोल्यांच्या भाड्याच्या जागेत राहतो, मंजुश्री ही त्याचीच मुलगी.डिफेन्स मध्ये जास्त महिला नाहीत आणि ज्या आहेत त्या कशा जातात याचा तिने शोध सुरू केला. हा शोध सुरू करताना तिला मार्गदर्शन लाभले ते फक्त गुगलचे. तासन तास शोध घेतल्यानंतर डिफेन्स मध्ये मुलींना जज म्हणून जाता येते हे तिला समजले आणि त्यासाठी तिने लॉ ला प्रवेश घेतला…. लॉ ला प्रवेश घेतला तो कोटा येथील राजस्थान सरकारच्या कॉलेजमध्ये; आता महाराष्ट्रातही लॉची अनेक कॉलेज असताना राजस्थानमध्ये प्रवेश का? हा प्रश्नही आपल्याला पडू शकतो. त्याचे उत्तर असे आहे की राजस्थान सरकारने तिला विशेष बाब म्हणून कॉलेजला न येता फक्त परीक्षा आणि प्रॅक्टिकलला येऊन ती तिचा अभ्यासक्रम पूर्ण करू शकते ही विशेष सूट दिली आहे. राजस्थानची मुख्यमंत्री म्हणून एक दिवस केलेले काम व घेतलेले निर्णय पाहून राजस्थानच्या मुख्यमंत्र्यांनी स्वतः विद्यापीठात फोन करून मंजुश्रीला ही सूट मिळवून दिली.मंजुश्री राजस्थानची एक दिवसाची मुख्यमंत्री कशी झाली हा प्रवासही अत्यंत रोचक आहे!

सत्यजित तांबे हे महाराष्ट्र युवक काँग्रेसचे अध्यक्ष असताना त्यांनी ‘मै भी नायक, सीएम फॉर वन डे – वेकप महाराष्ट्र’ नावाची एक मोहीम महाराष्ट्रात राबवली होती. या मोहिमेतून हुशार व सुशिक्षित युवकांना निवडून त्यांना काँग्रेस शासित राज्यात एक दिवस मुख्यमंत्री म्हणून काम करता येणार होते.

फेसबुकवर सत्यजित तांबे यांची यासंबंधीची पोस्ट पाहून मंजुश्रीने त्यासाठी अप्लाय केले आणि सुरुवातीला तिचा एक मिनिटांचा व्हीडिओ पाठवला. मी महाराष्ट्राची मुख्यमंत्री झाले तर कसा असेल माझा महाराष्ट्र? यावरून मंजुश्री ने पाठवलेल्या व्हीडिओची निवड झाली. त्यानंतर तिला सत्ताधारी पक्षाची आमदार म्हणून सरकार कडून अपेक्षित चांगल्या कामांसंबंधी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्यायची होती. त्या परीक्षेत देखील मंजुश्री प्रथम आली आणि तिची राजस्थानची एक दिवसाची मुख्यमंत्री म्हणून निवड झाली!

सत्यजित तांबे यांनीच तिला मुंबई ते जयपूर विमानाचे तिकीट काढून दिले. जयपूर विमानतळावर उतरताच तिला मुख्यमंत्री यांना जसा प्रोटोकॉल दिला जातो तशा पद्धतीने संपूर्ण प्रोटोकॉल मध्ये राजस्थानचे मुख्यमंत्री यांच्या घरी घेऊन जाण्यात आले….मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी सकाळी फ्रेश होऊन मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्यासोबत नाश्ता झाला, त्यावेळी गहलोत यांच्याशी चर्चा करताना जेव्हा त्यांना समजले की ही मुलगी फक्त 17 वर्षाची आहे त्यावेळी त्यांनी महाराष्ट्रातील मुलांना राजकारणाचा लवकर नाद लागतो का? अशी मिश्किल टिप्पणी केली; मात्र चर्चेमध्ये त्यांना या सतरा वर्षाच्या मुलीचे कॅलिबर लक्षात आले त्याच ठिकाणी त्यांनी स्वतःच्या PA ला सांगून ‘आज ही राजस्थानची मुख्यमंत्री आहे दिवसभर माझ्यासोबत असेल’ असे जाहीर केले. त्या दिवशी योगा योगाने ने महात्मा महात्मा गांधी जयंतीच्या निमित्ताने आयोजित केलेल्या सर्व कार्यक्रमांना मुख्यमंत्री म्हणून उद्घाटने करण्याचा मान दिला.सायंकाळी एका बुद्धिबळ स्पर्धेच्या राज्यस्तरीय कार्यक्रमाचे तिच्या हस्ते उद्घाटन झाले. त्यावेळी स्वतः अतिशय चांगली बुद्धीबळ पटू असणाऱ्या मंजुश्रीची स्टोरी ऐकून तेथील क्रीडामंत्र्यांनी तिला रात्रीच्या जेवणासाठी निमंत्रित केले. रात्री क्रीडा मंत्र्यांसोबत जेवण करत असताना त्यांनी तू आमच्या राज्याची मुख्यमंत्री आहेस, कोणते दोन निर्णय घेशील? असे विचारले असता, तिने स्वतः खेळाडू असल्याने आणि आपल्या देशात अनेक ग्रामीण भागात चांगले खेळाडू आहेत मात्र त्यांना परिस्थितीमुळे संधी मिळत नाही त्यासाठी क्रीडा विद्यापीठ असले पाहिजे आणि पदवी पर्यंत मुलींना मोफत शिक्षण मिळाले पाहिजे मग ती कोणत्याही जातीची असो; असे दोन निर्णय जाहीर केले. त्याच निर्णयाची राजस्थान सरकारने अंमलबजावणी केली. पुढे हेच दोन निर्णय महाराष्ट्रात आणि कर्नाटक मध्येही कॉपी करण्यात आले.

आज मंजुश्री ही जम्मू मधल्या डिफेन्स संस्थेत (National security studies) पुढील उच्च शिक्षण घेत आहे. देशात असे शिक्षण देणाऱ्या केवळ दोन संस्था असून या दोन पैकी एका संस्थेत 12 लाख विद्यार्थ्यांमधून तिची निवड झाली आहे…चार दिवसापूर्वी परळीचे बाजीराव धर्माधिकारी यांनी या मुलीबद्दल केलेल्या फेसबुक पोस्ट मधून मला तिची माहिती समजली आणि तिला भेटण्याची इच्छा झाली. उद्या जम्मूला जायचे असतानाही मी भेटणार म्हणून तिने आपला कार्यक्रम बदलून आजचे तिकीट रद्द केले आणि आज दोन तास तिच्यासोबत चर्चा करताना आपल्या सारख्या ग्रामीण भागातही किती मोठे टॅलेंट आहे, हे लक्षात आले!

साधा एखादा फॉर्म भरायचा म्हटलं तर अनेकांची त्रेधातिरपीट उडते. अशावेळी सतरा अठरा वर्षाची एक मुलगी इतकी मोठे ध्येय गाठू शकते याचे खरोखरच आश्चर्य आणि अभिमान वाटतो…डिफेन्स मधील पोस्ट ग्रॅज्युएशन पूर्ण करणे इतकेच तिचे ध्येय नाही तर आंतरराष्ट्रीय स्तरावरची पीएचडी तिला मिळवायची आहे. इस्राईल आणि अमेरिकेतील राष्ट्रीय सुरक्षा व्यवस्था विषयक अभ्यास तिला पुढे जाऊन करायचा आहे. म्हणतात ना जिनके सपने बुलंद और पंखो मे बल होता उन्हे आसमान भी छोटा लगता है…भारताच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव कसा साजरा झाला पाहिजे याबाबत मंजुश्रीने पंतप्रधानांना एक पत्र पाठवून 75 सूचना केल्या होत्या. त्यामध्येच ‘प्रत्येक घरात त्यादिवशी तिरंगा लावला पाहिजे’ अशी ही एक सूचना होती; ही सूचना करून एक वर्ष दीड वर्ष झाले मात्र तिचे पत्र चुकीच्या पत्त्यावर गेले. ते पंतप्रधानांपर्यंत किंवा त्यांच्या कार्यालयापर्यंत गेले किंवा नाही माहित नाही. मात्र तिने केलेली एक सूचना स्वीकारली गेली होती आणि यातूनच ‘हर घर तिरंगा’ ही मोहीम देशभरात नुकतीच राबवल्या गेली!

दिवाळीच्या सुट्टीत गावी असलो की असे टॅलेंट सापडते अशा लोकांसोबत बसणे, गप्पा मारणे हे खूप आनंददायी असते! मंजुश्रीला भेटून तिचा खूप अभिमान वाटला. तिला चित्रकला, ऍक्रेलीक पेंटिंग, ब्लॅक अँड व्हाईट स्केच बनवायचा छंद आहे. एक पेंटिंग आजच्या भेटीत तिने मलाही भेट दिली. फोटोमध्ये टेबलावर मांडलेले विविध पुरस्कारांचे मंजुश्रीचे वैभव पाहून मन आनंदी झाले. घर छोटे असल्याने पुरस्कार ठेवायला घरात जागा कमी पडावी यापेक्षा आणखी काय हवे!अगदी कमी वयात मंजुश्रीचे टॅलेंट हेरून तिला संधी देणाऱ्या सत्यजित तांबे यांनाही कॉल करून त्यांचे अभिनंदन केले. टॅलेंटचा शोध घेऊन त्याला अशी संधी देणाऱ्या सत्यजित यांचे काम कौतुकास्पदच आहे. मंजुश्रीचे स्वप्न पूर्ण होण्यासाठी व तिच्या भविष्यातील वाटचालीसाठी माझ्या मनापासून शुभेच्छा…अगदी कमी वयात मंजुश्रीचे टॅलेंट हेरून तिला संधी देणाऱ्या सत्यजित तांबे यांनाही कॉल करून त्यांचे अभिनंदन केले. टॅलेंटचा शोध घेऊन त्याला अशी संधी देणाऱ्या सत्यजित यांचे काम कौतुकास्पदच आहे. मंजुश्रीचे स्वप्न पूर्ण होण्यासाठी व तिच्या भविष्यातील वाटचालीसाठी माझ्या मनापासून शुभेच्छा…

प्रशांत जोशी…

प्रशांत जोशी हे विद्यमान आ. धनंजय मुंडे यांचे गेली अनेक वर्षांपासून स्वीय सहाय्यक म्हणून काम पहातात. आपले काका तत्कालीन उपमुख्यमंत्री गोपीनाथराव मुंडे यांची साथ सोडुन आ. धनंजय मुंडे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे स़दस्य झाले तेंव्हापासून आज पर्यंत ते आ. धनंजय मुंडे यांच्या कायम सोबत आहेत. आ. धनंजय मुंडे साहेब विरोधी पक्षनेते नेते असतांना, सामाजिक न्याय मंत्री असतांना प्रशांत जोशी यांनी आपल्या कामाची योग्य चुणूक दाखवण्याची संधी मिळाली, यापुढे मी निश्चित मिळेल!

प्रशांत जोशी हे खरं तर मुळ पत्रकार आहेत. सुरुवातीच्या काळात परळी येथे अत्यंत अभ्यासपूर्ण पत्रकारिता त्यांनी केली. पुढे गोपिनाथराव मुंडे राज्याचे उपमुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी त्यांचे काम पाहण्यास सुरुवात केली. आता गेली अनेक वर्षांपासून ते आ. धनंजय मुंडे यांचे स्वीट सहाय्यक म्हणून काम पहात आहे. गेली अनेक दिवसांपासुन राजकारण विरहीत पोस्ट त्यांनी आपल्या फेसबुक वॉलवर टाकली होती, ती जशीच्या तशी इथे आपल्यासाठी अवलोकनासाठी !

मंजुश्री ला “माध्यम” परिवाराच्या वतीने खुप खुप शुभेच्छा!!

Sudarshan Rapatwar

महाराष्ट्रातील प्रगल्भ पत्रकार मराठवाड्यातील पत्रकारितेला एक नवा आयाम देण्याचा त्यांचा यशस्वी प्रयत्न असतो. गावातील पत्रकारिता जिल्ह्यात, राज्य आणि देश पातळीवर नेण्यात त्यांचे मोठे योगदान आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker