महाराष्ट्र

परभणी शासकीय महाविद्यालयातील अध्यापनातील ३२ रीक्त जागांवर तात्पुरत्या स्वरूपात प्रतिनियुक्ती

परभणी येथे या शैक्षणिक वर्षापासून नव्याने सुरू होणा-या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक व सहाय्यक प्राध्यापकांच्या ३२ जागांवर राज्य शासनाच्या वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन विभागाने राज्यातील विविध शासकीय महाविद्यालयात कार्यरत असणाऱ्या ३२ जणांच्या प्रतिनियुक्तीचे आदेश १३ मार्च २०२३ रोजी संवैशिवसं/अस्था१ व २-राजप/प्रतिनि/परभणी/६६३१/२०२३ या कार्यालयीन आदेशान्वये काढले आहेत.
या संदर्भात राज्य शासनाच्या वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन विभागाने काढलेल्या कार्यालयीन आदेशात अधिष्ठाता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय परभणी यांचे पत्र क्रं. शावैमप/२०/२०२३ दि. ८ मार्च या पत्राचा संदर्भ घेत परभणी येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा राष्ट्रीय वैद्दक आयोगाचे झालेल्या निरीक्षणाचे अनुषंगाने त्रुटींची पुर्तता करण्याकरिता प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक व सहाय्यक प्राध्यापक या संवर्गातील रिक्त पदांवर खालील नमूद अध्यापकांची निव्वळ तात्पुरत्या स्वरूपात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय परभणी येथे प्रतिनियुक्ती करण्यात येत असल्याचे म्हटले आहे.

या ३२ अध्यापकांच्या केल्या प्रतिनियुक्त्या

या प्रतिनियुक्तीच्या यादीमध्ये डॉ. प्रतिमा कुलकर्णी, प्राध्यापक शरिररचनाशास्त्र, वि.दे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय लातूर,
डॉ. महेश शिंदे, सहाय्यक प्राध्यापक, शरिररचनाशास्त्र डॉ. शं.च. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नांदेड, डॉ. दिपक कावळे, सहाय्यक प्राध्यापक, शरिररचनाशास्त्र (विनिमं) स्वा.रा.ती.ग्रा. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अंबाजोगाई, डॉ. रुचिता माळवतकर, सहाय्यक प्राध्यापक, शरिररचनाशास्त्र, स्वा.रा.ती.ग्रा. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अंबाजोगाई, डॉ. विजयालक्ष्मी गवारे, सहाय्यक प्राध्यापक, शरिरक्रियाशास्त्र, (विनिम) स्वा.रा.ती.ग्रा. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अंबाजोगाई,
डॉ. हुमेरा खान, प्राध्यापक, जीवरसायन शास्त्र, डॉ.शं.च. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नांदेड, डॉ. लक्ष्मीकांत चेरेकर, सहयोगी प्राध्यापक, जीवरसायनशास्त्र, वि.दे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय लातूर, डॉ. वर्षा बोबडे, सहाय्यक प्राध्यापक, जीवरसायनशास्त्र, स्वा.रा.ती.ग्रा. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अंबाजोगाई, डॉ. सिमा काळे, सहाय्यक प्राध्यापक, जीवरसायनशास्त्र, स्वा.रा.ती.ग्रा. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अंबाजोगाई, डॉ. प्रिती पेंडकर, सहाय्यक प्राध्यापक, जीवरसायन शास्त्र, रा. छ.शा.म.शासकीय वैद्यकीय महाविद्यालय कोल्हापूर, डॉ. पंकज पाटील, सहाय्यक प्राध्यापक, औषधशास्त्र, डॉ. शं.च. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नांदेड, डॉ. रवीकुमार कांबळे, सहाय्यक प्राध्यापक, न्यायवैद्यक शास्त्र, स्वा.रा.ती.ग्रा. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अंबाजोगाई, डॉ. अनघा वरुडकर, प्राध्यापक, शल्यचिकित्सा शास्त्र, कर्करोग रुग्णालय औरंगाबाद,
डॉ. अब्दुल तांबोळी, सहाय्यक प्राध्यापक शल्यचिकित्साशास्त्र, डॉ. शं.च. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नांदेड, डॉ. अब्दुल राफे, सहाय्यक प्राध्यापक, शल्यचिकित्साशास्त्र, कर्करो रुग्णालय, औरंगाबाद, डॉ. मनोज मोरे, सहाय्यक प्राध्यापक, शल्यचिकित्साशास्त्र, कर्करोग रुग्णालय, औरंगाबाद, डॉ. पुनम कल्याणकर, सहाय्यक प्राध्यापक, शल्यचिकित्साशास्त्र, डॉ. शं.च. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नांदेड, डॉ. भक्ती कल्याणकर, प्राध्यापक, स्त्रीरोग व प्रसुतीशास्त्र, कर्करोग रुग्णालय औरंगाबाद,
डॉ. सुषमा गोरे, सहयोगी प्राध्यापक, स्त्रीरोग व प्रसुतीशास्त्र,श्री. व.ना. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, यवतमाळ, डॉ. संजय कुमार पगारे, सहयोगी प्राध्यापक, स्त्रीरोग व प्रसुतीशास्त्र, कर्क रोग रुग्णालय, औरंगाबाद, डॉ. जयदिपसिंग सोळंके, सहाय्यक प्राध्यापक, स्त्रीरोग व प्रसुतीशास्त्र, डॉ. शं.च. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नांदेड, डॉ. सलीम तांबे, सहयोगी प्राध्यापक, बाल रोगचिकित्साशास्त्र डॉ. शं.च. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नांदेड, डॉ. अंजली देशमुख, सहयोगी प्राध्यापक, औषधवैद्यकशास्त्र, स्वा.रा.ती.ग्रा. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अंबाजोगाई, डॉ. कैलास चिंतले, सहयोगी प्राध्यापक, औषधवैद्यकशास्त्र. औरंगाबाद कर्करोग रुग्णालय, डॉ. रमाकांत आलापुरे, सहयोगी प्राध्यापक, बधिरीकरणशास्त्र,कर्करोग रुग्णालय, औरंगाबाद, डॉ. विनय धकाते, सहाय्यक प्राध्यापक,बधिरीकरणशास्त्र श्री.व.ना.शासकीय वैद्यकीय महाविद्यालय यवतमाळ, डॉ. सुकेशीनी तामगाडगे, सहाय्यक प्राध्यापक, बधिरीकरण शास्त्र, अविरु अकोला
डॉ. विरेंद्रकुमार मोदी, सहाय्यक प्राध्यापक, बधिरीकरणशास्त्र.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अकोला, डॉ. अमर सुरजुसे, सहयोगी प्राध्यापक, त्वचा व गुप्तरोगशास्त्र,श्री. व. ना.. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, यवतमाळ डॉ. सुनिल हाके, सहयोगी प्राध्यापक, मनोविकृतीशास्त्र, डॉ. वै. स्मृ. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, सोलापूर, डॉ. गोपाळसींग सोळंके, सहयोगी प्राध्यापक, क्षयरोगशास्त्र, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अकोला, डॉ. अरुण नागरीक, सहाय्यक प्राध्यापक, दंतशास्त्र, डॉ.शं.च.शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नांदेड, डॉ. पंकज अहिरे, सहायोगी प्राध्यापक, क्षकिरणशास्त्र, कर्करोग, डॉ. चंद्रशेखर मुंडकर, सहाय्यक प्राध्यापक, क्षकिरणशास्त्र, रुग्णालय, औरंगाबाद वै. स्मृ.शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सोलापूर,डॉ. रिषभ विलाला, सहाय्यक प्राध्यापक, क्षकिरणशास्त्र, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अकोला यांचा समावेश आहे.

स्वारातीच्या ७ अध्यापकांचा आहे समावेश

सदरील ३२ अध्यापकांच्या तात्पुरत्या प्रतिनियुक्तीच्या यादीत अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयाच्या ७ सहयोगी प्राध्यापकांचा समावेश आहे.

४४८ पदर्निमितीस मिळाली होती मान्यता

परभणी येथे शंभर विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याकरिता आवश्यक पद निर्मिती बाबत शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागाने यापुर्वीच शासन निर्णय काढला आहे. याबाबत चार टप्प्यात लागणारी ४४८ पदे निर्माण करण्यास या विभागाने मान्यता दिली होतु. हे आदेश सहसचिव शिवाजी पाटणकर यांच्या स्वाक्षरीने काढण्यात आले होते. सदरील आदेशानुसार आता अध्यापन क्षेत्रातील ४२ रीक्त जागांवर तात्पुरत्या स्वरुपाची पदोन्नती करण्यात आली आहे.

सदरील आदेशात नमुद करण्यात आलेल्या अध्यापकांस संबंधित अधिष्ठाता यांनी प्रतिनियुक्तीच्या संस्थेत रुजू होण्यासाठी त्वरीत कार्यमुक्त करावे व त्याचा अनुपालन अहवाल संचालनालयास सादर करावा. उपरोक्त अध्यापकांना नियमानुसार प्रवासमत्ता व दैनंदिन भत्ता अनुज्ञेय राहील.


राष्ट्रीय वैद्यक आयोगाच्या मानकानुसार अध्यापकाची डिक्लरेशन फॉर्म वैधता तपासणीची जबाबदारी अधिष्ठाता यांची राहील.
तसेच अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, परभणी यांनी राष्ट्रीय आयुर्विज्ञान परिषेदेचे निरिक्षणाची पुर्तता झाल्यावर तात्काळ संबंधीत अध्यापकांना मुळ संस्थेत रुजू होण्याकरीता कार्यमुक्त करावे. असे या आदेशात म्हटले आहे. सदरील आदेशावर वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन विभागाच्या आयुक्तांची स्वाक्षरी आहे.

Sudarshan Rapatwar

महाराष्ट्रातील प्रगल्भ पत्रकार मराठवाड्यातील पत्रकारितेला एक नवा आयाम देण्याचा त्यांचा यशस्वी प्रयत्न असतो. गावातील पत्रकारिता जिल्ह्यात, राज्य आणि देश पातळीवर नेण्यात त्यांचे मोठे योगदान आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker