महाराष्ट्र
पत्रकार संरक्षण कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करा!
माध्यम न्युज नेटवर्क चे संपादक सुदर्शन रापतवार यांची मागणी
पत्रकार संरक्षण कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यात यावी या मागणीसाठी आणि पाचोरा येथील पत्रकार संदीप महाजन यांच्यावरील भ्याड हल्ल्याचा निषेध नोंदवण्यासाठी अंबाजोगाई शहरातील चार पत्रकार संघटनांच्या वतीने उपजिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येवून राज्य शासनाच्या विरोधात निदर्शने करण्यात आली होती. या मोर्चानंतर समाज माध्यमांसमोर माध्यम न्यूज नेटवर्क चा संपादक म्हणून सुदर्शन रापतवार यांनी आपली भुमिका समाज माध्यमांसमोर मांडली.
या भुमिकेला समाज माध्यमांवर व्यापक प्रसिद्धी देणा-या सर्व मित्रांचे सुदर्शन रापतवार यांनी आभार मानले आहेत.