पत्रकार प्रशांत जोशी यांचे निधन
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/07/IMG-20230730-WA0021-300x225.jpg)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/07/IMG-20230730-WA0021-300x225.jpg)
दैनिक मराठवाडा साथीचे कार्यकारी संपादक ज्येष्ठ पत्रकार प्रशांत प्रभाकरराव जोशी यांचे उपचारादरम्यान दि.30 जुलै 2023 रोजी पहाटे दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने वृत्तपत्र क्षेत्रात शोककळा पसरली आहे. मृत्यू समयी त्यांचे वय 56 वर्ष होते.
प्रशांत जोशी यांच्यावर लातूर येथील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना पुढील उपचारासाठी मुंबई येथील दवाखान्यात नेत असताना आज दि.30 जुलै 2023 रोजी पहाटेच्या दरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.प्रशांत जोशी यांच्या निधनाने वृत्तपत्र क्षेत्रावर शोककळा पसरली आहे. दैनिक मराठवाडा साथी या वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक म्हणून ते काम पाहत होते. प्रशांत जोशी यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन भाऊ असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिव देहावर आज दुपारी 4 वा. अंबाजोगाई येथे अंत्यसंस्कार बोरुळ तलाव स्मशानभूमी करण्यात येणार आहेत.