पत्रकारांचे हेडमास्तर… संतोष मानुरकर!


२० जानेवारी. संतोष मानुरकर यांचा वाढदिवस म्हणून आजचा दिवस खास! संतोष हा माझा जुना मित्र. माझी आणि त्याची पत्रकारिता ही तशी काहीशी मागे-पुढेच सुरु झालेली. आम्ही पत्रकारितेत मागे पुढे आलो असलो तरी माझी पत्रकार म्हणून खरीओळख निर्माण झाली ती लोकमत या अग्रगण्य दैनिकात काम करीत असताना. तशी संतोष ची खरी ओळख निर्माण झाली ती झुंजार नेता या दैनिकात काम करीत असतांना!


जेष्ठ पत्रकार संपादक मोतीरामजी वर्षे आणि कार्यकारी संपादक एकनाथ आबुज यांच्या मार्गदर्शनाखाली संतोष ची पत्रकारिता फुलत गेली, बहरत गेली. जिल्हा दैनिकात एक साधा पत्रकार म्हणून काम करणारा संतोष आपल्या सकारात्मक आणि प्रगल्भ लेखणशैलीमुळे अगदी कमी वयातच जिल्हाभर ओळखल्या जावू लागला. झुंझार नेता दैनिकात पत्रकार, उपसंपादक ते कार्यकारी संपादक असा त्याचा चढता प्रवास काबीले तारीफच आहे.
पत्रकारीतेत अगदी सुरुवातीपासुन काम करीत असताना संतोष ने सत्याचा पकडलेला धागा कधीच सोडला नाही. चार पैसे अधिक मिळतील म्हणून त्याने आपल्या भुमिकेत कधीही बदल केला नाही. सत्याची साथ आणि सकारात्मक पत्रकारितेचे सुत्र त्याने सांभाळले म्हणूनच तो आज पत्रकारांचा हेडमास्तर म्हणून शोभतो आहे!


गेली चार दशकांपासून पत्रकारीतेत हुकमी एक्का म्हणून वावरणाऱ्या संतोष मानुरकर यांच्या लेखणीचा
स्पर्श ज्यांच्या राजकीय सामाजिक जीवनाला झाला त्यांच्या आयुष्याला निश्चितच एक झळाळी मिळाली. त्याच्या लेखनामुळे अनेक जण प्रसिध्दीच्या उच्च शिखरावर जाऊन बसले असल्याचे, राजकीय क्षेत्रात उच्च पदावर पोहोचल्याचे आपण पहातो आहोत.
गेली चार दशकांपासून पत्रकारिता करीत असतांना एक हाडाचा पत्रकार कसा असावा याबद्दल चे मापदंड समजावून घेण्यासाठी संतोष च्या पत्रकारीतेकडे पाहीले पाहीले, एवढे चांगले काम त्याने केले आहे.
पत्रकारिता करीत असतांना, पत्रकारितेत स्वतःचे एक वर्तुळ, नाव केलेले असतांनाही संतोष चे इतरांशी अदबीने वागणे, प्रत्येकाचा सन्मान करणे, मोठेपणा देणे, सामान्य माणसाला प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणे हे त्याच्या स्वभावाचे पैलू त्याची नवी ओळख झालेल्यांनाही भुरळ पाडून जातात.
संतोष च्या हाताखाली मागील चार दशकात शेकडो पत्रकार घडली. स्वतः च्या कार्यपद्धतीतुन एक दिशादर्शक काम करणाऱ्या संतोष ने आपल्या मार्गदर्शनाखाली काम केलेल्या पत्रकारांशची शाळा भरवली तर तो चांगला हेडमास्तर म्हणून निश्चितच शोभेल!


संतोष पाच वर्षांपूर्वी झुंझार नेता दैनिकात बाहेर पडला. आलेल्या बिकट परिस्थितीतवर मात करु शकणार नाही तो हाडाचा पत्रकार कसला! संतोष ने नव्याने स्वतः चे साप्ताहिक सुरु करुन पुन्हा पत्रकारितेचा नवा अध्याय सुरू केला. वर्षभरात स्वतः चे दैनिक सुरू केले. बीड जिल्ह्यातील चांगल्या सशक्त पत्रकारांची टीम एकत्र केली. लोकप्रभा हे दैनिक केवळ त्यांच्या मालकीचेच नाही तर ते या दैनिकात काम करणाऱ्या सर्व पत्रकारांच्या कामगारांच्या मालकीचे आहे हा विश्वास प्रत्येकाच्या मनात निर्माण केला. बघताबघता लोकप्रभा चे नेटवर्क संपुर्ण मराठवाड्यात उभे केले. आणि अल्पावधीतच एक लोकप्रिय आणि लोकांनी प्रथम मान्यता दिलेल्या यादीत लोकप्रभा चे अढळ स्थान निर्माण केले. संतोष ने घेतलेली ही झेप फिनिक्स पक्षाने घेतलेल्या गरुडझेपेला साजेशिच आहे!
गेली अनेक वर्षांपासून माझा मित्र असलेल्या संतोष चार वाढदिवस! त्याच सोबत त्याने सुरु केलेल्या लोकप्रभा चार तिसरा वर्धापन दिन! या दोन्ही प्रसंगाचे औचित्य साधत संतोष ला माझ्या कडुन आभाळभर शुभेच्छा!
जुग जुग जियो संतोष..!
🙏