पंकजा मुंडे यांनी मतदारांशी साधला प्रातिनिधिक संवाद
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2024/03/img-20240328-wa0064110018149679943544-1024x683.jpg)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2024/03/img-20240328-wa0064110018149679943544-1024x683.jpg)
भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय सचिव तथा बीड लोकसभेच्या उमेदवार पंकजाताई मुंडे हया सध्या झंझावाती दौऱ्याने बीड जिल्हा ढवळून काढत आहेत. काल केजनंतर आज अंबाजोगाईत दिवसभर त्यांनी मतदारांच्या गाठीभेटी घेत थेट संवाद साधला. ठिक ठिकाणी त्यांचं उत्स्फूर्त स्वागत झालं. सकाळी श्री योगेश्वरी देवीचे दर्शन घेऊन त्यांनी दौऱ्याला सुरवात केली.
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2024/03/img-20240328-wa00558552162682685768941-1024x682.jpg)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2024/03/img-20240328-wa00558552162682685768941-1024x682.jpg)
शहरात आगमन होताच पंकजाताईंनी श्री.योगेश्वरी देवीचे दर्शन घेतले. याप्रसंगी प्रसारमाध्यमांशी संवाद साधतांना पंकजाताई म्हणाल्या, जिल्ह्यातील ज्या ज्या ठिकाणी जाईल तिथे भावना व श्रद्धेने नतमस्तक होत असते.दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडे व माझी आई नवरात्रात अष्टमीला श्री.योगेश्वरी देवीच्या दर्शनाला येत असत ही आमच्या परिवाराची परंपरा राहिली आहे.
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2024/03/img-20240328-wa00599149727105991473519-1024x683.jpg)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2024/03/img-20240328-wa00599149727105991473519-1024x683.jpg)
जनसेवेचे बळ मिळावे असे देवीकडे आशीर्वाद मागितले. जनता जनार्दनाचे माझ्या पाठिशी सदैव आशिर्वाद आहेत. लोकांशी संवाद साधत असताना त्यांची देहबोली मला विजयी आशीर्वाद प्रदान करणारी आहे. जनतेचा अभुतपूर्व प्रतिसाद मिळत आहे त्यामुळे आपल्याला सन्मानजनक विजयाचा विश्वास असल्याची प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली.यावेळी आ.नमिताताई मुंदडा,अक्षय मुंदडा,गयाताई कराड आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2024/03/img-20240328-wa00547795680502114864806-1024x682.jpg)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2024/03/img-20240328-wa00547795680502114864806-1024x682.jpg)
पंकजाताई मुंडे यांनी शहरात दिवसभर फिरून विविध क्षेत्रातील नागरिकांच्या भेटी घेण्यावर जोर दिला. सामाजिक, शैक्षणिक, वैद्यकीय, वकील, ज्येष्ठ नागरिक आदी क्षेत्रातील नागरिकांना भेटून आपुलकीचा संवाद साधला .
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2024/03/img-20240328-wa00571375774967946373704-1024x682.jpg)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2024/03/img-20240328-wa00571375774967946373704-1024x682.jpg)
सर्वच ठिकाणी त्यांचं जोरदार स्वागत झालं. माजी नगराध्यक्ष राजकिशोर(पापा) मोदी यांच्या निवासस्थानी मोदी परिवाराकडून अतिशय जिव्हाळ्याने त्यांचं स्वागत करण्यात आलं. यावेळी भेटीदरम्यान कौटुंबिक तसेच लोकसभेच्या दृष्टीने अंबाजोगाई शहर व तालुक्यातील विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. यावेळी पदाधिकारी,कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
••••