पंकजा मुंडे, खा. प्रितम मुंडे २ फेब्रुवारी अंबाजोगाईत; कार्यक्रमांचे आयोजन
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/02/IMG_20230201_121806-300x231.jpg)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/02/IMG_20230201_121806-300x231.jpg)
भाजपाच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई गोपीनाथ मुंडे उद्या दि.02 फेब्रुवारी रोजी शहरात येत असुन त्यांच्या उपस्थितीत खोलेश्वर महाविद्यालय स्नेह संमेलनाचे उद्घाटन आणि प्रवक्ते राम कुलकर्णी यांच्या निवासस्थानी गोपीनाथराव मुंडे तैलचित्राचे अनावरण कार्यक्रम संपन्न होणार आहे.
भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेच्या खोलेश्वर महाविद्यालयात चालु शैक्षणिक वर्षात स्नेह संमेलन उपक्रमाचे आयोजन करण्यात आले असुन त्याचे उद्घाटन उद्या दि.02 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता संपन्न होत असुन त्या कार्यक्रमासाठी पंकजा मुंडे यांची आवर्जुन उपस्थिती राहणार आहे.
या शिवाय संस्थेचे कार्यवाह डॉ.हेमंत वैद्य, आ.सौ.नमिता मुंदडा, बिपीन क्षीरसागर, चंद्रकांत मुळे, राम कुलकर्णी, कल्पना चौसाळकर, आप्पाराव यादव, वर्षा मुंडे, विजय वालवडकर, अविनाश तळणीकर आदी मान्यवरांची उपस्थिती रहाणार असल्याची माहिती प्राचार्य डॉ.मुकूंद देवर्षी यांनी दिली.
गोपीनाथराव मुंडे यांच्या तैलचित्राचे अनावरण
याच दिवशी दुपारी एक वाजता भाजपा प्रवक्ते राम कुलकर्णी यांच्या निवासस्थानी गोपीनाथ मुंडे तैलचित्राचे अनावरण मान्यवरांच्या शुभ हस्ते होणार असुन जिल्ह्याच्या खा.डॉ.सौ.प्रितम मुंडे, आर.टी.देशमुख,राजेंद्र मस्के, अक्षय मुंदडा, रमेश आडसकर, संपादक अजित वरपे,संपादक संतोष मानुरकर, बिपीन क्षीरसागर, मकरंद पत्की, आर्किटेक दिनेश पुरी, बाळु बडे आदी मान्यवर उपस्थित रहाणार असल्याची माहिती कुलकर्णी बंधु यांनी दिली.