निवडणुक प्रचारासाठी लग्नाचा फंडा;मला निवडून द्या मी तुमची लग्न लावून देतो– राजेसाहेब देशमुख
परळी विधानसभा निवडणुकीत आपल्याला निवडुंग द्यावे यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार आघाडीचे उमेदवार राजेसाहेब देशमुख यांनी लग्नाचा फंडा वापरला आहे. मतदार संघातील तरुण अविवाहित मुलांना त्यांनी मला निवडून द्या मी तुमची लग्न करुन देतो असे आवाहन केले आहे.
विधानसभा निवडणुका या विकासाच्या प्रश्नावर लढवण्याचा पारंपारिक प्रघात आपल्या कडे आहे. मात्र अलिकडे याला जातीय स्वरु मिळाल्याचे दिसत असतांना आता त्याच्याही पलिकडे जाऊन लग्नाच्या विषयाला हात घालण्यात आला आहे.
महाराष्ट्रात मुलींचे प्रमाण कमी झाले असल्यामुळे व विशेषतः मुलींना कमी कुटुंबातील भरपुर पॅकेज असलेला मुलगाच आपला साथीदार असावा असे वाटत असल्यामुळे शहरी व ग्रामीण भागातील तरुणांची वय ४० पार होत आली तर त्यांना मुलगी पसंती देत नसल्याचे दिसून येते. अशा परिस्थितीत तरुण अविवाहित मुलांची संख्या मोठ्या प्रमाणावर झाली आहे. हाच मुद्दा प्रकर्षाने महत्वाचा मानत राजेसाहेब देशमुख यांनी आपल्या प्रचार सभेतील भाषणात “मला निवडून द्या मी तुमची लग्न लावून देतो” अशी साद घातली आहे.
राजेसाहेब देशमुख हे परळी विधानसभा मतदारसंघातील ना. धनंजय मुंडे यांचे विरोधात प्रबळ उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहेत.
